Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandrakant Dhangawhal

Others

3  

Chandrakant Dhangawhal

Others

बाहुली

बाहुली

1 min
159


आई जाते मी

येते म्हणायला लावू नकोस

माझ्या चिंतेत राहू नकोस

मला माहीत आहे

मी बाहेर गेल्यावर

माझी लाडकी बाहुली

हातात घेऊन तू

दारात उभी राहतेस

सारखं सारखं घरात बाहेर करतेस

तुझ्या जीवाची घालमेल

कोणालाच बघवत नाही

मी घरी आल्याशिवाय

तू उंबरठा सोडत नाही


खरं आहे ना

मी तुझी लाडकी मुलगी आहे

म्हणून तुला भिती वाटते

घर सोडताना डोळे भरून बघते

पण तुला सांगू का आई

ज्यांच्या मुली घरी आल्याच नाही 

त्यांच्या आईचं काय?

त्या आजही बाहुली घेऊन दारात उभ्या आहेत

लेक लाडकी घरी परत येण्याची वाट पाहताय


तुला सांगू का

कितीही मान खाली घालून निघाले ना तरी

नजर त्यांची अंगभर फिरत असते

कितीतरी अपशब्द कानावर घेत असते

 

छेडायला तर चौका चौकात उभे असतात

पाहून पाहून डोळे तृप्त

करून घेतात


मार्ग कितीही बदलवला

तरी नजर बदलत नसते

दुसऱ्या कोणावर रोखलेल्या नजरेला

त्यांच्या लेकी-बहिणी दिसत नसते

माणूस चांगला की वाईट

काहीच कळत नाही

कोणाचीही नजर 

शरमेने झुकत नाही

कोण कसे वाईट नजरेने पाहतात

ते त्यांच्या मातेच्या गर्भाचा उद्धार करत असता


या पुरूषप्रधान देशात 

स्त्री खरंच बाहुली आहे तिला कधी कठपुतळीसारखी नाचवली जाते तर कधी ती बंधनाच्या पिंजऱ्यात बंदिस्त असते

तिने फक्त घाबरून जगायचं असतं

माणसाच्या गर्दीत जळून मरायचं असतं


Rate this content
Log in