अवकाळीचा पाऊस
अवकाळीचा पाऊस
काल सकाळी अशा अवकाळी
सावळ्या नभातूनी सरी गर्जत आल्या.......
कोरड्या मातीतून उठतो सदा सुगंध
पण काल पसरला शोकच सबंध
रुसला तो का कोण जाणे
जरी धरतीचे अन् त्याचे जुनेच बंध.........
गेले वाहून उंबरठ्यावरचे मोती
झाली बळीच्या स्वप्नांची माती
केले प्रयत्न सारे सावरण्याचा हाती
मुठी उघडता होती फक्त रेती......
कोण जाणे पावसाने का माजवला असा काहूर
मानवाच्या आशेचा निघाला महापूर
कोण करेल या समस्येला दूर
प्रयत्न की आत्महत्या?