STORYMIRROR

sanjana Durgude

Others

4  

sanjana Durgude

Others

अस्थिर झालेल्या मुलीला पाहिले

अस्थिर झालेल्या मुलीला पाहिले

1 min
516

अस्थिर झालेल्या मुलीला मी पाहिले

तिच्या तल्या अस्थिरतेला पाहिले

मी विचार करते,

असे का झाले?


समाजाच्या अपेक्षांचे तिला

ओझे झालेले मला जाणवले,

त्या ओझ्यामूळे अस्थिर झालेल्या,

मुलीला मी पाहिले...

तिच्यातल्या अस्थिरतेला पाहिले..


नुकतेच झाले आहे तिचे लग्न,

आणि आता चालू आहे चर्चा

ती आई होण्याची,

नको आम्हाला मुली, मुलगाच पाहिजे,

अशा अपेक्षा पाहून घाबरली आहे ती

अस्थिर झालेल्या मूलीला मी पाहिले...

तिच्यातल्या अस्थिरतेला पाहिले...


अडकला आहे तिचा पदर

बाप, नवरा व मुलगा यांच्या कुंपणात

आणि हरवले आहे तिच्यातले मी पण

अंगवळणी पाडलेल्या सवयीने

हरवले आहे तिचे महत्त्वाचे क्षण,

बोचतो आहे हा अडवणारा समाज तिला,

टोचतो आहे हा घाबरवणारा समाज तिला

अस्थिर झालेल्या मुलीला मी पाहिले...-

तिच्यातल्या अस्थिरतेला पाहीले


उपलब्ध नाही तिच्याकडे या परिस्थितीला

दूर लोटण्याचे साधन,

नकोसा वाटतोय तिला हा स्त्री जन्म

बोलून, भांडण, लढून आता रडतीये बिचारी

वाट पाहतीये मरणाची,

मिळालेला स्त्री जन्म संपण्याची

मिळालेला स्त्री जन्म संपण्याची!!


Rate this content
Log in