STORYMIRROR

sanjana Durgude

Others

3  

sanjana Durgude

Others

कळतयं का कुणाला?

कळतयं का कुणाला?

1 min
175

कळतयं का कुणाला काय झालंय या जगाला

नाही कोणी सांगायला

, नाही कोणी बोलायला

नाही कोणी सोबत हसायला आणि रडायला


मग काय बरं आहे असं आपल्यासाठी करायला?


दुखीतासोबत दु:ख त्यांचे वाटावे,

आनंदाचे दोन शब्द बोलावे

भटक्यांना योग्य वाट दाखवावे

सत्याच्या मार्गावर चालावे


बोलता बोलता समजावे अनेकांना


आनंदाच्या क्षणाबरोबर खेळवावे भावनांना

रागावर करा नियंत्रण कळवावे मानवांना

एकजुटीने सोबत आणावे सर्वजनांना


असे केल्याने असतील सोबती आपल्या

सगळे सांगायला आणि बोलायला


राहतील सोबत हसायला व रडायला

हे सर्वच आहे करायला.


कळतयं का कुणाला काय झालंय या जगाला?

 



Rate this content
Log in