STORYMIRROR

sanjana Durgude

Others

2  

sanjana Durgude

Others

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

1 min
155

अभिव्यक्ती स्वातंत्र्यात चर्चा येते वाद नाही

ज्ञान शक्ती आहे, पण शक्ती ज्ञान नाही

पण सत्ताधाऱ्यांच्या मते शक्तीच ज्ञान आहे


अभिव्यक्ती स्वातंत्र्यास एक मूल्य स्विकारावे

विचार करण्याची पद्धती कशी असावी हे

सांगणे बंद करावे


सांगणे म्हणजे प्रबोधन नाही

तर त्यांना विचार करण्याची

परवानगी देणे आहे

खऱ्या अर्थाने सुधारणा आहे


गरजू आणि गरीबांच्या हक्काच्या रक्षणासाठी बोला

मा. गांधी आणि डॉ. आंबेडकरांनी या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा

बरा उपयोग केला

आता तुम्हीही करा


समाजदेखील आता विचारांना वैचारिक पातळीवर

स्विकारत नाही व नाकारतही नाही

तर कोण विचार मांडतो त्यावरून स्विकारतो

व नाकारतो


हीच गोष्ट मग अभिव्यक्ती स्वातंत्र्यास

घातक ठरते


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन