STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

अशी असावी कविता

अशी असावी कविता

1 min
330

अशी असावी कविता 

मन थुईथुई नाचावं 

चारचौघांत असलं तरी 

मनातल्या मनात गुणगुणावं...!!


अशी असावी कविता 

मिळाली मनाला उभारी

जिद्द ,बळ निर्माण करून

द्यावी यशाची ललकारी....!!


अशी असावी कविता 

शब्द शब्दांत माधुर्य पाझरावं 

ऐकताच एकदा कविता 

देहभान व स्वतःला विसरावं....!!


अशी असावी कविता 

काळजाच्या आत घुसावी 

अशी असावी कविता 

गोरगरिबांची असू पुसावी....!!


अशी असावी कविता 

माणुसकी त्यात दिसावी 

कोण्या एकट्यासाठी नसून 

एकता त्यात असावी.....!!


अशी असावी कविता 

गरिबीचं पांघरून व्हावी 

अशी असावी कविता 

जशी हिरव्या तृणाची लव्हाळी....!!


अशी असावी कविता 

अंगी बळं निर्माण करावी  

उसवलेल्या संसाराचा 

थोडा आधार व्हावी....!!


अशी असावी कविता 

आंधळ्याची काठी व्हावी 

बुडत्याचा हात होवून 

बळीच्या मुखात न्हावी....!!


अशी असावी कविता 

जी सर्वानी वाचावी 

मनी उमटलेल्या रेषांनी 

कधी ना पुसावी.......!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन