आलं पाहिजे
आलं पाहिजे
1 min
14.1K
मला दु:खात स्वत:ला घट्ट धरता आलं पाहिजे
मला आनंदात स्वत:पासून मुक्त होणंही जमलं पाहिजे
मला माझ्या सावलीशी भांडता आलं पाहिजे
मला माझ्या उन्हाशी खेळणंही जमलं पाहिजे
मला माझ्या अशांततेत शून्य होता आलं पाहिजे
मला माझ्या शांततेत अनंत होणंही जमलं पाहिजे
मला सुंदर फूल होवून फुलता आलं पाहिजे
मला पानगळीसारखं विखुरणंही जमलं पाहिजे
मला अनेक होवून कविता लिहीणं आलं पाहिजे
मला मी होवून माझ्या भावनांचं खाजगीपणही जपलं पाहिजे
