STORYMIRROR

Amruta Kulkarni

Others

0  

Amruta Kulkarni

Others

एकांत माझा

एकांत माझा

1 min
327


कधी आरोह 

कधी अवरोह 

श्वास माझा 

जरा नाटकी 

जरा खराही 

पैलू माझा 

स्तब्ध काही 

चंचल काही 

डोळ्यांत माझ्या 

आस तुझी 

ध्यास तुझा 

स्वप्नांत माझ्या 

तू असाही 

तू तसाही 

माझ्यांत माझा 

थोडा हवासा 

थोडा नकोसा 

एकांत माझा 

 


Rate this content
Log in