आजकालची पिढी
आजकालची पिढी
आजकालची पिढी,
मोबाईलने झाली वेडी.
जपायला नाती नाही वेळ,
मोबाईलवरच खेळतात खेळ.
म्हणे कमाल ही तंत्रज्ञानाची,
येथे गरज भासेना कोणाला कोणाची.
फेसबुकवर हजारो मित्र खरे,
भेटल्यावर एकही ओळख देईना बरे.
आईला म्हणे मम्मी बापाला डॅडी,
मोबाईलने झाली सारीच वेडी.
फेसबुकची ओळख मैत्रीत झाली,
अन नकळतच प्रेम करू लागली.
तासनतास फोनवर बरळू लागली,
प्रेमाच्या आणाभाका घेऊ लागली.
वास्तविकता बघा कशी विसरून चालली,
आजकालची पिढी स्वप्नाळू बनू लागली.
जीवनाची यांच्या विस्कटली घडी
मोबाईलने झाली सारीच वेडी.
