आजच काव्य
आजच काव्य
1 min
383
कधीतरी लहानपणी ऐकल होत
प्रेम म्हणजे उदात्त काही अस
धरती च सृष्टी वरच,
नदीच लेकरां वरच
आभळाच सार्यांवरच !
पण आतातर फक्त.....
तो आणि ती...तीच आणि त्याच
गुलुगुलु त्या दोघांच
एवढ्यातच का आजच प्रेम उरल ?
कुणीतरी म्हटल लिहलेल वाचल
काव्यात असावा गर्भित अर्थ
फुटावी प्रश्नांना शब्दातुन वाचा
पण आतातर फक्त.....
तेच तेच तुझ तुझ्यासाठी
तेच तेच रुसवे अन आसवे
त्यांचेच या ना त्या शब्दात मांडणे
तरीही त्यांना ओह आणि वाह !
दिसेना कुणा तोच तोच पणा ?
उलट सापडतो अर्थ छुपा ?
एवढ्यातच का आजच काव्य उरल ?
