आधुनिक गांधी

आधुनिक गांधी

2 mins
237


आधुनिक गांधी

ट्रिंग ट्रिंग. . . ऑपरेटर रिसीव्हर उचलतो आणि "हॅलो" म्हणतो.

दुसर्‍या बाजूने: "मी मोहन गांधी बोलत आहे".

ऑपरेटर: - "हो, हो, तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे?"

दुसर्‍या बाजूने: - "श्रीमती कांचन यांच्याशी"

ऑपरेटर: - "कृपया प्रतीक्षा करा" असे म्हणत ऑपरेटरने रिसीव्हर खाली ठेवला आणि श्रीमती कांचन यांना इंटरकॉम बजर देणारा संदेश दिला. "

श्रीमती कंचन: - "कुणाचा फोन आहे "?

ऑपरेटर: - "मोहन गांधी ".

श्रीमती कांचन: - "त्याला सांगा, मी येथे नाही, माझी बदली झाली आहे."

ऑपरेटर: - "पण मी कसं खोटे बोलू? तूम्ही समोर बसला आहात "

श्रीमती कांचन: - (रागाने) "मी म्हणते ना तुला ,सांग त्याला, मी नाही आहे इथे. "

ऑपरेटर: - "बरं, मॅडम पण तूम्हाला कां त्याच्याशी बोलायच नाही . मला तरी सांगा .

श्रीमती कांचन:" नंतर सांगते,आधी त्याला डिसकनेक्ट कर . साहेब बाहेर आहेत कधी ही फोन करतील . फोन जास्त वेळ एंगेज ठेऊ नको . ते वैतागतील ."

ऑपरेटर: -" हो मॅडम लगेच फोन फ्री करतो ." तो फोनवर गांधी ला मॅडम नसल्याची सूचना देऊन. परत त्यांच्याशी बोलु लागतो .

ऑपरेटर: - मॅडम सांगा ना त्याच्याशी तुम्हाला कां बोलायच नव्हत?


कंचन मॅडम : "मला त्याच्याशी बोलायलाच नाही. दारुडा कुठला ! कुठुन भेटला ठाऊक नाही.  घरदार सांभाळायला होत नाही , कुंटुंबाला सांभाळायची काळजी नाही . वेळेचं पण भान नसत, चौवीस तास नसती दारु ढोसायला हवी. हे चांगले झालं की आम्ही तिथून शिफ्ट झालो आहोत. नाहीतर झालं… काय होतं माहित नाही? "

ऑपरेटर: - "पण त्याला कसं कळल कि तुम्ही इथे कामाला आहात?

कंचन मॅडम : " एक दिवस, त्याच्या पत्नी सोबत बोलताना त्यानं ऐकले कि, मी अमृत डिस्टिलरीमध्ये आहे आणी कारण आपल्याला कमी दरात मिळते तेव्हा पासुन तो दारुसाठी मागे लागला. खरं म्हणजे मी फक्त इथं कामाला आहे. त्याला दारु घरपोच करायला नाही "

 ऑपरेटर: - "तर हा तुमचा शेजारीच रहातो , मॅम? "

कांचन मॅडम : - "दुर्दैवाने"!

            ऑपरेटर ही गोष्ट ऐकुन त्या गांधीत आणि आधुनिक गांधी यांच्यात किती फरक आहे .हे कळल्यावर तो आश्चर्यचकित झाला. एक होते ते, म्हणजे ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, ज्यांनी सर्वप्रथम देशातून मद्यपान संपवण्याचा, दारूच्या सवयींचा नाश करून, गुलामीविरुद्ध लढा देण्यासाठी प्रत्येकाला जाणीव करून देऊन . दारूबंदी करण्याचा खुप प्रयत्न केले. ब्रिटीशांशी लढा देऊन त्यांना भारतातून हाकलून दिले. आणि एक हा उघडपणे दारू मागतो !. अरे लाज वाटात नहीं त्याला नांव मोठं लक्षण खोटं ! ...


                     


Rate this content
Log in