#Thankyou Teacher

PARTICIPATE

Share with friends

शिक्षक दिव्यासारखे असतात - इतरांचा मार्ग प्रकाशमान करण्यासाठी ते तेवत असतात.


ज्ञान, शिक्षण आणि माहितीचा उत्तम स्रोत म्हणजेच शिक्षक होय. शिक्षकांनी रचलेला पाया आपल्याला आयुष्यभर मदत करत असतो. शिक्षक प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शन करणारा प्रकाश आहे आणि ते जगाकडे कसे पाहावे हे सांगत आपले विचार घडवतात, आपले व्यक्तिमत्त्व घडवातात.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या दि. 5 सप्टेंबर रोजीच्या जयंतीदिनी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो आणि यानिमित्ताने स्टोरी मिररने आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे योगदान व त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'थँक्यू टीचर' ही लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

 

नियम :

 • सहभागी स्पर्धक दिलेल्या संकल्पनेवर आधारित कथा/कविता, काल्पनिक लघुलेखन/अवतरणे सादर करु शकतात.
 • संपादकीय गुण आणि सादर केलेली रचनेच्या वाचकांना खिळवून ठेवण्याच्या आधारावर विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
 • सहभागी स्पर्धकांनी आपली मूळ रचना सादर करावी. सादर केल्या जाणार्‍या रचनेच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही.
 • आपल्या रचनेत "#ThankyouTeacher" हा हॅशटॅग वापरावा.
 • कोणतीही शब्द मर्यादा नाही.
 • आपल्या रचना व टॅगमध्ये ‘शिक्षक दिन’, ‘धन्यवाद, शिक्षकांनो’ हे शब्द वापरा.


साहित्य प्रकार :

 • कथा
 • कविता
 • कोट्स/अवतरणे
 • कृतज्ञता भाव/ओळी (कोट्स प्रकारामध्ये सादर करा)


बक्षिसे :

 • प्रत्येक भाषेतील उत्कृष्ट 3 कथा/कविता, काल्पनिक लघुलेखनाला अनुक्रमे स्टोरी मिरर शॉपचे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य सदस्यत्व मिळेल.
 • विजेत्यांना प्रशस्तीपत्र मिळेल.
 • सर्व सहभागी स्पर्धकांनी स्टोरी मिरर डॉट कॉमवरुन पुस्तके खरेदी करण्यासाठी रु. 100/-चे कुपन मिळेल.


रचना सादर करण्याचा कालावधी : 1 सप्टेंबर 2020 ते 30 सप्टेंबर 2020

निकाल : ऑक्टोबर 2020


संपर्क :

ईमेल: neha@storymirror.com

फोन नंबर: +91 9372458287