नवरात्र
नवरात्र
अश्विनशुद्ध प्रतिपदेपासून देवी जगदंबेची घटस्थापणा होते.नऊ दिवस अगदी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण सगळीकडे असते.नऊ दिवस दांडिया खेळल्या जातात.वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा करून ढोल, ताशा, संगीत, दांडियावाद्य,नगाडा
लोकसंगीत तसेच महिला नऊ दिवसाचे नऊ रंग परिधान करतात.
1) पहिली माळ--रंग पांढरा
पांढरा रंग आत्मशांती व सुरक्षितता याचे प्रतीक मानला जातो.
2 )दुसरी माळ----रंग लाल
लाल रंग उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो.
3 )तिसरी माळ--- रंग निळा
निळा रंग समृद्धी आणि शांततेचा प्रतीक आहे.
4 ) चौथी माळ---रंग पिवळा
पिवळा रंग आशावादी आनंदी असण्याचे प्रतीक आहे.
5 )पाचवी माळ----रंग हीरवा
निसर्गाचे प्रतीक, वाढ, शांतता, स्थिरता याचे प्रतीक आहे.
6 )सहावी माळ---रंग राखाडी
राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे.
7 )सातवी माळ----रंग केशरी
सकारात्मक ऊर्जा मनाला उत्साह
देणारा आहे.
8 ) आठवी माळ---रंग मोरपंखी
निळ्या आणि हिरव्या रंगाचे मिश्रण समृद्धी आणि नविनतेचे प्रतीक.
9 )नववी माळ---रंग गुलाबी
सौहारदा व आपुलकीचे प्रतिक मानला जातो.
अशाप्रकारे नऊ दिवसाचे नऊ रंग घालून महिला आनंदी उत्साही असतात.
नवमीला पुरण पोळीचा नैवेद्य सवाष्ण ब्राम्हण जेवू घालतात यादिवशी देवी जगदंबेचे उपवास सुटत असतात.
रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवीच्या मंदिरात जातात.देवीची ओटी भरतात.
ढोल ताशे वाद्यांचा गजर आरतीची रोजची घाई यामध्ये नऊ दिवस कसे निघून जातात ते कळतच नाही.
मग दहाव्या दिवशी दसरा
आपट्याची पाने मोठ्यानं देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात.
छोट्या मुलांची तर मजाच असते आपट्याची पाने दिल्यावर चॉकलेट, रेवडी, वेगवेगळा खाऊ गोळा करत असतात.
मोठी माणसं सिमोल्लघनाला जातात. आपट्याची पाने म्हणजेच सोन नऊ दिवस उगवून आलेले धन देतात.
मनोभावे देवीला नमस्कार करतात.
