STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

रहस्यमय कथा

रहस्यमय कथा

2 mins
177

शिष्य एकदा एका जंगलातून चालता चालता शिष्याला एका झाडाखाली गुरुजी बसलेले दिसले , त्याला खूप आनंद झाला.


त्याने गुरुजींना नमस्कार केला , दोघेजण फिरत फिरत चालले होते .गप्पा मारता मारता गुरुजी एका झाडाखाली बसले आणि शिष्याला सांगितले की, "मला खूप तहान लागली पाणी घेऊन ये,"


 शिष्य एका नदीजवळ गेला त्या नदीतून चिखलाने भरलेली बैलगाडी बाहेर येतांनी त्याने बघितली.


पाणी सगळं गढूळ झालं होतं तेंव्हा तो गुरुजीकडे आला आणि म्हणाला, "गुरुजी मी तुम्हाला पाणी आणू शकलो नाही कारण पाणी खूप घाण आहे.मला माफ करा."


परत थोडावेळ चालणे झाल्यावर परत गुरुजी म्हणाले, मला पाणी आणून दे शिष्य गेला अजूनही पाणी गढूळच होते .नाराज होऊन तो परत वापस आला .माफ करा अजूनही पाणी गढूळच आहे.


थोडे पुढे गेल्यावर परत गुरुजींनी सांगितले, हे शिष्य मला खूप तहान लागली आहे .शिष्यही आता खूप परेशान झाला काय करावे तीन वेळेस असेच झाले .परत शिष्य पाणी आणायला गेला तेव्हा सगळे गढूळ पाणी निवळले होते.


शिष्य खूप खुश झाला त्यांनी तांब्याभर स्वच्छ पाणी गुरुजीसाठी घेतले. आणि आनंदाने आला गुरुजींना पाणी देतांना शिष्य म्हणाला, गुरुजी आता मी गेलो तेव्हा पाणी स्वच्छ होते त्याचे रहस्य काय ते मला सांगा?


गुरुजी म्हणाले, तू तीन वेळेस गेला तरी पाणी गढुळ होते.तू त्या पाण्याला स्वच्छ होईपर्यंत वेळ दिला.तेव्हा पूर्ण गाळ खाली बसून ते पाणी स्वच्छ झाले.


सगळं शांततेने घेतल घाई केली नाही.


असच आपल्या जीवनात असत प्रत्येक गोष्टीचा शांततेत विचार केला.घाईत निर्णय कधीच घ्यायचा नाही. मग सगळे चांगले होते. 


प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्यावा लागतो.आततायीपणा करून आपलेच नुकसान होते .रहस्य उलगडून सांगून गुरुजींनी आपल्या शिष्याला समजावून सांगितले.


Rate this content
Log in