STORYMIRROR

भरत टोणपे

Others

3  

भरत टोणपे

Others

क्रांतीकारकांच्या कथा

क्रांतीकारकांच्या कथा

1 min
256

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके  आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेम्बर 1845 ला शिरढोण रायगड जिल्हा येथे झाला.लहानपणापासून च मैदानी खेळ व कुस्ती ची आवड होती त्यांनी ब्रिटिश सरकार मधे मिलिटरी अकाऊन्ट खात्यात नोकरी केली परंतु दुष्काळ आंणि प्लेग च्या साथीत ब्रिटिश सरकारची भारतीय जनते विषयी अनास्था पाहुन त्यांनी ती नोकरी सोडून भिल्ल व कोळी समाजाच्या मदतीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्या साठी सशस्त्र संघटन सुरू केले ,ब्रिटिश सरकार ला हादरे दिले त्यांनी ब्रिटिश धार्जिन्या सावकार व जमिनदारावर दरोडे टाकून स्वातंत्र्य लढ्यासाढी लागणारी शस्रे घेण्यासाठी पैसा उभा केला व महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केले, त्यांची वाढती लोकप्रियता पाहून ब्रिटीश घाबरले व त्यांना पकडण्यासाठी चार हजार रुपये चे ईनाम जाहिर केले, परंतु वासुदेव फडके यांनी त्या ऊलट ब्रिटिश अधिकारी मारणार्याला 75000 रूपयेचा इनाम देण्याचे फर्मान शनिवारवाडा येथे लावले, ब्रिटिशांनी त्यांना पकडून तुरुंगात टाकले परंतू ये तुरूगांतून पळून जाण्यात यशस्वी झाले परंतु काही कालावधी नतंर त्यांना पुन्हा ब्रिटिशांनी पकडून भारतापासून दूर एडन येथे तुरूंग वासात टाकले.आंणि तुरूंग वासात 17 फेब्रुवारी 1883 ला त्यांचा मृत्यू झाला, अशा शूर स्वातंत्र्य सेनानी ना शतशः प्रणाम


Rate this content
Log in