STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

निवृत्ती नंतरचे जीवन

निवृत्ती नंतरचे जीवन

1 min
204

निवृत्ती नंतरचे जीवन


निवृत्ती म्हणजे आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेली पोहचपावती.


निवृत्तीचा एक छान समारोप ज्यात आपल्या कामाची शिस्त, चांगले काम करणारे व्यक्तिमत्व अस सगळ्याच्या तोंडून ऐकतांना जो आनंद असतोना तो वेगळाच.


आता घरी रोज आपल्यासोबत काम करणाऱ्यांची रोज आठवण पण एवढे मात्र आहे आता आठवण आल्यावर आम्ही एकमेकांच्या घरी जाऊन भेटू शकतो बोलू शकतो.


एकमेकांचे दुःख एकमेकांना सांगू शकतो. आता आमच्यासाठी रोज रविवार असेल म्हणजे सुट्टीचा दिवस.


निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा की जिथे आपले नोकरीचे ५८ वर्ष पूर्ण होते आणि आपल्याला कामातून निवृत्त केले जाते.


नातवंडासोबत आता खेळायचे

हवे तिथे फिरायला जायचे।

गरमागरम खायचे प्यायचे

सौभाग्यवतीचे कौतुक करायचे।


आराम नसतोच कधी कोणाला

पण आता वेळेचं बंधन नाही।

मनासारखं सगळं करता येईल

सुखद थांबा असे जरासे काही।


नोकरी करतांना आलेले गोड कडू अनुभव, आपल्या मित्रातलेच कोणीतरी समजून सांगणारे, कोणी कान भरून देणारे, टोमणे मारणारे , कोणी न बोलता सगळे प्रश्न शांततेत सोडवणारे.


काही खरे काही खोटे

आपल्याच भोवती सगळे मुखवटे।

ओळखायचे कसे ते सांगाना

कधी आपले कधी परकेपणाने वागणारे।


असे अनेक प्रकारचे मित्र, सुखद दुःखद अनुभव घेत.प्रत्येक प्रसंगाला तोंड देत वयाची 58 वर्ष पूर्ण करत आता सगळी गणगण संपलेली असते.


आता जीवन 

सुखात जगायचे।

आनंदात स्वतःचे

दिवस घालवायचे।


Rate this content
Log in