भारत देश माझा
भारत देश माझा
भारत देश माझा कृषिप्रधान देश आहे. माझ्या भारत देशात काळ्या मातीत राबणारे शेतकऱ्यांचे हात आहेत.
मी भारत देशात राहते याचा मला अभिमान आहे .तिरंगा झेंडा आमच्या भारत देशाची शान आहे. स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेकांनी जीवाचे बलिदान दिलेले आहे .
त्यांनी घरादाराचा विचार न करता सुखी संसाराचा विचार न करता ते आपल्या देशासाठी लढले त्यामुळे आपला भारत स्वतंत्र झाला .
आपल्या भारताचे राष्ट्रगीत जन गण मन म्हणताना ,मला खूप अभिमान वाटतो.
आपल्या भारत देशात अशा शूर वीर माता आहे ज्यांनी आपल्या मुलांना आपल्या देशासाठी समर्पित केले आहे.
अशा थोर माता भगिनींचा मला नेहमी अभिमान वाटतो.
