STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

आई,माता, जननी

आई,माता, जननी

1 min
223

खरच तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे.जुन्या म्हातारपण आलेल्या प्रत्येकाच्या माता किती आनंदी आणि समाधानी रहायच्या.


नऊ दिवसाचे नवरात्र आले की, त्या सगळी तयारी करायच्या देवीची मनापासून भक्ती करायच्या.भजन सरस्वती बसवणं तिची आरती भजन, देवीला जाण ,घरात काय आहे काय नाही ते पहान.


आदिमायाच त्यांना शक्ती देत असावी.स्त्री सूक्त भजनाचे गाणे , सगळं कसं वेळेवर आवरून तयार असायच्या. ना कधी चीड चीड ना कधी कोणाला ओरडणं.


त्यांना कशाच्या नऊ रंगाच्या साडया आणि कशाच काय?जे आहे ते घालून आनंदी आणि नेहमी प्रसन्न दिसायच्या.


साध्या राहणीमानात पण किती सुंदर दिसायच्या .त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसायचं.


आपल्या फरा ळातला घरातून घास एकमेकींना द्यायचा.वाटून खाल्ले म्हणजे त्याची पोट लवकर भरायची.


आताच्या मुलींना तर एका रंगाच्या चार पाच साड्या तरी कोणत्या घालाव्या त्याच कळत नाही.


देवीच्या दर्शनाला गेल्या की. सोबत मोबाईल असतोच लवकर देवीचे दर्शन करून होत .यांचं फोटो काढणं सुरु मग लगेच स्टेटसवर मॅडम आज कोणत्या देवीला जाऊन आल्या हे सगळ्याना समजत.


उपाशी राहण्याची सवय जुन्या बायकांना, तरी त्या कधी थकत नाही.कोणी काहीही म्हटलं तरी हसतमुखाने करायला तयार.


त्यांची बरोबरी आता कोणीच करू शकत नाही.अशा सर्व देवीची कृपा असणाऱ्या सगळ्यांच्या मातांना माझा साष्टांग नमस्कार


Rate this content
Log in