STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

गृहिणी

गृहिणी

1 min
91

गृहिणी होणं इतकं सोपं नसत

प्रत्येकाच मन जपता जपता

स्वयंपाक घरात राबता राबता

अर्ध आयुष्य निघून जात.


काही मानधन नसत तिला तरी ती आपल्या घरासाठी राब राब राबत असते.सकाळपासून ठरलेल्या कामाचा दिनक्रम मार्गी लावत असते.


नोकरी करणाऱ्या महिलांची किती कौतुक असत .शिवाय हातात पगार त्यामुळे चार पैसे खेळते असतात हातात,त्यामुळे ती हवे तसे पैसे खर्च करू शकते.तिला कोणाच्या हाताकडे पाहण्याचीही गरज भासत नाही.


गृहिणीला तर सकाळपासून कामेच असतात .उठल्यापासून प्रत्येक काम ती मनातून आपल्या घरासाठी करत असते.

घरात काय आहे काय नाही , कपडे इस्त्री, मुलांची शाळेत ने आण, त्यांचा अभ्यास , केरकचरा, फरशी पुसणे,पाहुणे आले तर त्यांचं मनापासून स्वागत, चहा नाश्ता, असे अनेक कामे ती जबाबदारीने पार पाडत असते.


भाज्या आणण्यापासून तर त्या डब्यात भरून ठेवणे.कुठली भाजी कधी करायची याचा अंदाज ती रोज लावत असते.


प्रत्येकाच्या वस्तू जागेवर ठेवणे ,कपड्याच्या घड्या घालणे, तिने लावलेली कपाटे तर इतकी सुंदर असतात .मायेचा हात त्या वस्तुंना लागलेला असतो.


म्हणूच घरात असावी गृहिणी

तेथे नाही कशाची कमी।


घरातल्या गृहिणीने अभिमानाने सांगावे हो मी एक गृहिणी आहे . घरासाठी राबणारी, सगळ्यांवर लक्ष ठेवणारी, लेकरांना मायेन घास भरवणारी, प्रत्येक काम चुटकीसरशी करणारी मीच माझ्याघरातली अन्नपूर्णा एक 

काटकसरी गृहिणी.


Rate this content
Log in