STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

पाऊस पडला नाही तर--

पाऊस पडला नाही तर--

1 min
233

पाऊस आल्यावर सगळीकडे पाणीच पाणी असते

सगळीकडे चिखल शाळेत जातांना पण खूप पाणी अंगावर उडते


सगळीकडे रेनकोट ,छत्र्या दिसू लागतात

कोणाची कोणाची तर शाळा देखील गळत असते

त्यामुळे कधी कधी पाऊस नको वाटतो.अस वाटत मनाला कधी पाऊस संपावर गेला तर


परत वाटते नकोरे बाबा! पाऊस हा हवाच

कारण पाऊस नसला तर नदी, नाले, धरण सगळे आटून जाईल


उन्हाळ्यात लाही लाही होण्याच्या उन्हाला कोण शांत करेल

माणसं पाण्यावाचून तडफडतील

शेतकऱ्यांची वाईट अवस्था होईल


पाण्यासाठी लोक परेशान होतील कोणाला पाणी प्यायला मिळणार नाही


म्हणून पाऊस संपावर न गेलेलाच बरा


पाऊस आल्यावर ओल्या मातीचा किती छान सुगंध दरवळतो

सगळीकडे हिरवेगार जणू काही निसर्गाने हिरवळीची शाल पांघरली असे वाटते


पावसाळ्यात किती नयनरम्य वातावरण असते

पावसात पडलेले झाडावरचे टपोरे थेंब दवबिंदू किती छान दिसतात

मोर थुई थुई नाचतांना किती छान दिसतो


हे सगळे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी पाऊस हा हवाच


Rate this content
Log in