नवरात्रातले नऊ दिवस
नवरात्रातले नऊ दिवस
ईश्वरी तशी खूप हुशार आणि प्रेमळ तसाच तिला देवाचाही खूप नाद ,एरव्हीच ती सगळं देवाच व्यवस्थित करायची .
आतातर नवरात्र म्हंटल्यावर सकाळी उठल्यापासून तिची धावपळ सुरू शिवाय तिने नऊ दीवसाचे उपवास पकडले होते.
सकाळची आरती माळ करून देणे सगळं सकाळी उत्साहाने करायची.सगळ्यांच्या स्वयंपाक सगळं नियमित करायची.
नऊ रंगाच्या साड्यांची तर तिने आधीच तयारी करून ठेवली होती.रोज जो रंग असेल तो घालून त्यावर मॅचिंग ज्वेलरी घालून भजनाला सुद्धा नित्य नेमाने हजर रहायची. रोज देवीच्या दर्शनाला जायची.
रोहीतला तिची धावपळ दिसत होती तो म्हणायचं, "सगळं कर पण फराळाच पोटभर करत जा,"
घरात त्याने बरीचशी उपवासाचे चिवडा अस बरच आधीच आणून ठेवलं होतं.
पण तिला सगळ्यांच आवरून झाल्यावर स्वतःला करून खायचं जीवावर येत होत.तरी ईश्वरी नेहमी उत्साही आनंदी असायची.
संध्याकाळची आरती झाल्यावर दांडीया खेळायला जायची .तिला लहानपणापासून दांडिया खेळायची खूप आवड त्यामुळे पहिले बक्षीस तिचे ठरलेले असायचे.
एक दिवस सगळ्याची जेवण झाल्यावर गॅसवटा आवरत असताना रोहित तिच्याजवळ गेला आणि विचारलं, '"तू काय केलंस फराळाला तेंव्हा ती थोडी शांत बसली आणि म्हणाली," हे काय आता करणारच होते मी फराळाच".
रोहितच्या ते लक्षात आलं त्यांन एक ताट घेतल त्यात सफरचंद चिरून ठेवलं, बटाट्याचा चिवडा,
दोन राजगिऱ्याचे लाडू ,पेंड खजुर चार पाच ,अस सुशोभित ताट तयार केलं.
कारण त्यानी आणलेलं सगळं जसेच्या तसे होत. तीच आवरल्यावर तिला डायनींग टेबलवर बसवलं आणि ताट पुढे ठेऊन "हे सगळ गुपचूप खाऊन घ्यायचं अस बजावून सांगितलं."
त्याच बजावन आज तिच्या प्रेमाखातर होत ,तसंआज ईश्वराला देखील खूप भूक लागली होती.सगळं समोर येताच तिने अर्ध्या तासात संपून टाकलं आणि पोट भरल्याची ढेकर दिला.
रोहितला खूप आनंद झाला,"बघ बर इतकं उपाशी पोट ठेऊन झोपणार होती ना?
इश्वरीचे डोळे पाणावले, तसा रोहित म्हणाला, "आमच्या सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय करणारी घरची लक्ष्मीचं उपाशी राहील तर कसे चालेल?
दुसऱ्या दिवशी नवमीला सगळं स्वयंपाक ईश्वराने उत्साहाने केला. सवाष्ण, ब्राम्हण, मुंजा, कुमारिका घरातल्या सगळ्यांना पोटभर जेवू घातले .
विडा दक्षणा ,त्यांना नमस्कार करूनओटी भरून हसतमुखाने वाटी लावले.
सासुबाईच आणि रोहितच मुलांचं पहिल्याच पंगतीला जेवण झालं होतं.सासूबाई हात धुतलाआणि लगेच गॅसवर तवा ठेवला. सुनेसाठी गरम पुरणाच्या पोळ्या केल्या तस रोहितने पाट रांगोळी केली आणि सगळं ताट वाढून ईश्वरीला तटावर बसवले आणि गरम गरम पोटभर जेवू घातले.
तस ईश्वरी मनोमन खूप सुखावली, तिला खूप आनंद झाला.रोहितने तिला पोटभर जेवू घातले. तोपर्यंत मुलींनी सगळ्या नऊ दिवसाच्या साड्या ज्वेलरी सगळं आवरून जागेवर ठेऊन दिल.
इश्वरीने सगळ्यांचे मनात आभार मानत होती आणि म्हणत होती."हे देवा माझं घर असच हसत खेळत राहू दे त्याला कुनाची दृष्ट लागू देऊ नको.
आणि सगळ्यांना माझ्या घरातल्यासारखी प्रेमळ माणसं मिळो देत.
आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याला घरातल्या सासू सासऱ्याना आपट्याची पाने देऊन मनोभावे नमस्कार केला.
रोहितला आणि मुलांना घेऊन आपल्या माहेरी आई वडिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेली. अशीच नेहमी सुखी आनंदात रहा असा आशीर्वाद घेतला.
अशाप्रकारे ईश्वरीचा दसरा आनंदाने साजरा झाला.खरच तिच्या घरातल्या माणसासारखी माणसं सगळ्यांना मिळो. आणि सगळ्याच वैवाहिक जीवन आनंदात सुखात जाओ हीच जगदंबा मातेकडे मनपूर्वक प्रार्थना.
