भक्त जें जें कर्म करिती
भक्त जें जें कर्म करिती
1 min
7.0K
भक्त जें जें कर्म करिती ।
तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥
हें तों नवल नव्हे देवा ।
भुललासी भक्तिभावा ॥२॥
वाग्दोर धरुनी दांतीं ।
चारी घोडे चहूं हातीं ॥३॥
धूतां लाज नाहीं तुला ।
दासी जनी म्हणे भला ॥४॥