माझी आई
माझी आई
1 min
296
माझी परम गुरु माझी आई ।
माझ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू माझी आई ॥
माझ्या अस्तित्वाचा आरंभ माझी आई ।
माझ्या धैयाची आठवण माझी आई ॥
माझ्या स्वप्नपूर्तीची गुरुकिल्ली माझी आई ।
माझ्या कर्तृत्वाचे कोडकौतुक करणारी माझी आई ॥
माझ्या निरागस हास्याचे मूळ माझी आई ।
माझे आणि माझ्या बहिणींचे पाठबळ माझी आई ॥
माझ्या संसाराची बाग फुलत राहावी म्हणून काळजी घेणारी माझी आई ।
ह्या संसाराला आध्यात्माचा वसा देणारी माझी आई ॥
आपल्या कर्तृत्वाने,आचरणाने जगासमोर आदर्श असणारी माझी आई ।
वात्सल्याचा झरा आणि इच्छापूर्तीचा कल्पवृक्ष असणारी माझी आई ॥
अशा माझ्या थोर आईला मातृदिनाच्या शुभेच्छा आणि कोटी कोटी प्रणाम॥
