Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

उंबरठा🙏🌹🙏

उंबरठा🙏🌹🙏

3 mins
188


यशस्विनी तशी गरीब कुटुंबातली देखणी ,हुशार तिला दोन बहिणी घरी आई वडिलांची परिस्थिती बेताचीच 12वी नंतर यशस्विनीचे लग्न झाले.

एक वर्षानंतर तिच्या घरी एक सुंदर मुलीने लक्ष्मीच्या पावलाने जन्म घेतला म्हणून तिचे नाव लक्ष्मी ठेवले. लक्ष्मी हळू हळू मोठी होत होती तस तिच्या सगळं लक्षात येत होत की आई वडिलांची परिस्थिती नाजूक होती तरी ते तिला पोटाला चिमटा घेऊन शिकवत होते.आणि लक्ष्मी देखील हुशार होती मन लावून शिकत होती. मोठं झाल्यावर तिने मनाशीच ठरवलं की,आपण मोठं झाल्यावर आई वडिलांना त्रास होणार नाही असेच वागायच तशी ती समजदारीने वागत होती.शिक्षणाबरोबर आई तिला चांगले संस्कार देत होती, तिच्याजवळ असणारे ज्ञान देत होती.एकदा अश्याच माय-लेकीच्या गप्पा रंगल्या,यशस्विनी सांगत होती की, "हे बघ लक्ष्मी तुझा जन्म झाला तेंव्हा तू माझ्या घरात माझी मुलगी म्हणून लक्ष्मीच्या पावलाने आली, आणि तू पहिल्यांदा घराचा उंबरठा ओलांडला,त्याला तुझं माहेर म्हणण्यात आलं.आणि आई वडीलांची एक आदर्श मुलगी म्हणून आहे त्या परीस्थितित आनंदाने समाधानाने जगली.आईच्या गप्पा ती शांततेने आणि मन लावून ऐकत होती. नंतर पुढे यशस्विनी म्हणाली,स्त्रीला तिच्या मानाचे ,अभिमानाचे दोनच उंबरठे ओलांडण्याचा अधिकार आहे. तिसरा उंबरा तिच्यासाठी कधीच नसतो, हे सगळ ऐकतांना लक्ष्मी गोष्टीसारखं तिला पुढं काय? पुढं काय?असं विचारत होती.आपल्या आईच इतकं सुदर ज्ञान ऐकून आपली आई किती हुशार आहे हे तिला पटत होत.पुढे काय ?

आता यशस्वनिला थोडं गहिवरून आलं होतं ती म्हणाली,"आता तू मोठी झाली आता तुझ्या लग्नाची तयारी होईल ,तुला स्थळ बघायला सुरुवात केली आता आमची चिमणी थोड्या दिवसाने आमच्यापासून दूर जाईल,दोघीच्या डोळ्यात पाणी आले होते.तशी आई डोळे पुसत म्हणाली, आता पुढचे नीट ऐक आता सासरी जाशील तेंव्हा तू सासरचा दुसरा उंबरठा ओलांडशील, तेथे तुझ्या हक्काच्या घरात तुचे सन्मानाने स्वागत होईल.नववधू म्हणून तुला सासरी सगळे सहन करावे लगे काही चुकले तर वेळप्रसंगी बोलणे खावी लागतील.कधी तुमच्या दोघात भांडणे वादिवाद होतील, कधी सासू सासरे रागावतील, तरी तुला राग येऊ द्यायचा नाही, आपले चुकले तर ऐकून घायचे उलट उत्तर द्यायचे नाही.आई वडील जसे बोलता रागवता तेव्हा तुला राग येत नाही ना ? आमचा तस समजायचं कारण सासरचा उंबरठा ओलांडून रागाने कधीच बाहेर पडायचं नाही  कारण तो आपल्या स्वतःच्या घराचा आणि आपल्या हक्काचा उंबरा असतो.तशी लक्ष्मी म्हणाली, आई हे मी नीट लक्षात ठेवेल, यशस्वनीने लेकीला छान समजून सांगितलं,

पाच, सहा महिने गेले लक्ष्मीचं लग्न झालं आईने सांगितलं तस तीच दुसऱ्या हक्काच्या उंबरठ्यात स्वागत झालं होतं .आईच समजून सांगणं तिला सारखं आठवण देत होत.दिवसामागून दिवस जात होते ,थोड्या दिवसांनी गैर समजामुळे आजू बाजूंच्यांनी कान भरल्यामुळे घरातले वातावरण गढूळ झाले होते, सगळे लक्ष्मीला येता जाता बोलत होते.पतीदेव सुद्धा त्यांच्या आई वडीलाकडून बोलत होते, तिला खूप राग येत होता, अस वाटत होत माहेरी निघून जावं, दारापर्यंत आलेली लक्ष्मीला तिच्या आईचे शब्द आठवले, रागात भलत सलत पाऊल उचलायचा नाही, आणि आपला हक्काचा उंबरठा ओलांडायचा नाही .तशी ती माघारी फिरली आणि शांततेने परत घरात कमला लागली. दोन दिवसाने घरातल्या मंडळींची चूक त्यांना कळाली, सगळे गैरसमज दूर झाले.पतीदेवानी देखील क्षमा मागितली.सगळं आनंदी वातावरण निर्माण झालं.तशी लक्ष्मीला आईचे शब्द आठवले आणि म्हणाली, आई बाबा मी माझा सासरचे हक्काचं उंबरठा रागाने कधीच ओलांडणार नाही अगदी तुमच्याकडे येण्यासाठीही. आले तर मान सन्मानाने चार दिवस येईल.आई बाबा मी देखील तुमचीच गुणी लेक आहे अस म्हणून अश्रूला पाण्याच्या काठाचा बांध लावून हसत हसत कामाला लागली. अस प्रत्येक आईने मुलीला समजून सांगितलं तर किती छान ना?तुम्हाला काय वाटत? मला कळवा?


Rate this content
Log in