Nilesh Bamne

Others

2  

Nilesh Bamne

Others

तो जाणता झाला...

तो जाणता झाला...

6 mins
1.6K


अडगळीच्या सामानाची आवरा आवर करताना जुन्या कागदपत्रांवर नजर फिरविताना विजयला एक चिठ्ठी सापडली जवळपास दहा वर्षांपूर्वी लिहिलेली ती चिठ्ठी होती. ती चिठ्ठी विजयच्या लहान बहिणीने अर्थात विजयाने तिच्या होणाऱ्या लहान दिराला लिहिली होती. ती चिठ्ठी विजयला सापडली होती याचा अर्थ ती दिली नव्हती अथवा ही कच्ची चिठ्ठी असावी. आता या चिठ्ठीला दहा वर्षे झालेली होती. ही चिठ्ठी लिहिली तेव्हा विजया अकरावीला होती. विजया विजयची लाडकी एकुलती एक बहीण होती म्हणून विजयने तिच्यासाठी तिच्या भविष्यासाठी खूप स्वप्ने पाहिली होती. पण विजया सतराव्या वर्षीच एका अल्पशिक्षित नव्याने गावावरून मुंबईत आलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. तो मुलगा चांगलाच होता पण त्याच्यावर बुरसटलेल्या विचारांचा पगडा होता. विजयाने त्या चिट्टीत आपल्या लहान दिराला तो ही अल्लड लिहले होते माझी तुमची वहिनी होऊन लवकरात लवकर तुमच्या घरी येण्याची इच्छा आहे पण विजयच्या आग्रहाखातर मला शिकावे लागतेय ! म्हणजे शक्य झाले असते तर ती सतराव्या वर्षीच बोहल्यावर चढायला तयार होती. म्हणजे विजयने तिला शिकविणे हा तिच्या दृष्टीने तिच्यावरील अन्याय होता. विजयला गरिबीमुळे नाही शिकता आले खूप म्हणजे खूपच हुशार असतानाही पण आपल्या भावंडाना शिक्षण मिळावं म्हणून तो वयाच्या सोळाव्या वर्षांपासून काबाड कष्ट करत होता. दिसायला तो खूप सुंदर होता त्याच्याशी बोलायला मुली व्याकुळ असायच्या पण आपल्या कुटुंबाला दिशा द्यावी म्हणून त्याने स्वतःची दिशा कधी भरकटून दिली नाही आणि ज्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभं करून समाजात मानसन्मान मिळवून द्यायचं स्वप्न पाहिलं होत त्या स्वप्नाची किंमत त्याच्या बहिणीच्या लेखी कवडीमोलाची होती. साऱ्या जगाला वाटत की विजयला कविताच्या प्रेमप्रकरणाबद्दल कल्पना नव्हती पण तस नव्हतं तिच्या प्रेमप्रकरणात नाक घुपसलेल्या प्रत्येका बद्दलची तिडीक त्याच्या डोक्यात आजही आहे त्या प्रत्येकाचा तो आजही पाणउतारा करतो. विजयचा विजयाच्या प्रेमाला विरोध नव्हता तीच प्रेम गुंडालायला त्याला एक क्षणही लागला नसता पण ! कोणाच्याही व्यक्तिगत स्वातंत्र्यात ढवळाढवळ करणे त्याला मान्य नव्हते. पुढचे परिणाम त्याला माहीत होते म्हणून कमीत कमी बारावी पूर्ण कर मग लग्न कर असा दबाव विजयने विजयावर टाकला होता पण त्यातही तिच्या भविष्याची काळजी होती. तिच्या भविष्याची काळजी घेण्याइतकी अक्कल तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्यात नव्हती ना त्याच्या कुटुंबात विजयचा तिच्या प्रेमाला लग्नाला विरोध नव्हता पण काही वर्षे तो पुढे ढकलावा आणि नीट विचार करून योग्यवेळ परिस्थिती पाहून करावा असे वाटत होते पण विजयची आई तीही अशिक्षित अनाडी आणि बाप मुलीच्या प्रेमात आंधळा झालेला त्यात धाकट्या भावाला त्याच्या लग्नाची घाई सुटलेली म्हणून तो ही स्वतः च्या भविष्याचा नव्हे स्वार्थाचा विचार करून तिला मदत करत होता आर्थिक मदतही केली तिच्या लग्नाला त्याच्या प्रेमासाठी ! विजयने विजयाच्या लग्नाला तांत्रिक विरोध केला तर विजयची आई विजयला म्हणाली, मग ! काय ? अगोदर तुझं लग्न करायचं काय ? आईचा हा प्रश्न विजयाच्या हृदयाला घाव करून गेला. विजयने कधीच स्वार्थ पाहिला नव्हता पण त्याच्या आईनेच त्याला झोपेतून जागा केला होता. विजयने आपल्या कुटुंबासाठी पाहिलेली सारी स्वप्ने उध्वस्त करून त्याच्या कुटुंबातील सारे आंनदोत्सव साजरा करत होते. त्याक्षणी विजयने ठरविले आता स्वप्ने पाहणे बंद आणि विजयने स्वप्ने पाहणे सोडून दिले. त्यांनतर प्रत्येक गोष्ट त्याने फक्त औपचारिकता म्हणून केली. नातेवाईकांच्यात मिसळणे बंद केले . कोणतेच सण साजरे केले नाहीत आणि केले तर ते फक्त देखल्या देवा दंडवत म्हणून तो मित्रांपासूनही दूर झाला. त्याने व्यसनाना जवळ केले ना देवाला जवळ केले ते ज्ञानाला. पूर्वी लक्ष्मीच्या मागे लागणारा विजय आता लक्ष्मीला टाळू लागला त्यामुळे एका क्षणाला त्याच्यावरच हात पसरण्याची वेळ आली पण तरीही तो डगमगला नाही लोक तर त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतच होते पण त्याच्या जवळचेही मागे नव्हते . विजयला सारे कळत होते पण त्याचे काही जात नव्हते म्हणून तो गप्प होता . विजयाने लग्नानंतर लगेच एका मुलाला जन्म दिला पण त्या मुलाचा जन्म अज्ञानातून अथवा अपरिहार्यतेतून झाला होता. तो ही विजयला खटकला होता . पण विजय काही बोलला नाही. विजयच्या लहान भावाला त्याच्या प्रेयसी सोबत लग्न करायचे होते . त्याची प्रेयसी आणि विजया यांच्यात फार अंतर नव्हते पण दोघींचे नशीब वेगळे होते विजयाने आपले चांगले नशीब खराब करून घेतले होते तर हिने आपले नशीब खुलवले होते . आपल्या मोठ्याभावाच्या अगोदर लग्न केले तर समाज काय म्हणेल ? या भीतीने विजयाचा भाव त्रस्त होता म्हणून त्याने विजयाच्या लग्नाचा घाट घालण्यासाठी आपल्या अशिक्षित आई- बापाचा ढाली सारखा वापर केला . विजयच्या डोक्यात तिडीक होतीच ती पूर्ण करण्याची संधी त्याने सोडली नाही त्याच्यासाठी सांगून येणारी प्रत्येक मुलगी नाकारली. मग नाईलाजाने जगाला विजय लग्नच करायला तयार नाही म्हणून मी नाईलाजाने लग्न करतोय असे सांगून हा बोहऱ्यावर उभा झाला. त्याला विजयाने पाठिंबा दिला कारण तिच्या लग्नाला त्याचा पाठिंबा होता ना ! एकूणच कुटुंबातील सर्यांचाच स्वार्थ पाहिल्यावर विजयने अविवाहित राहण्याचा निदान त्याच्या विचारांचा सन्मान करणारी कोणी मग ती कोणत्याही जाती - धर्मातील का असेना येत नाही तोपर्यत लग्न न करण्याचा निर्णय घेतला . विजयने आपल्या परीने समाजसेवा करू लागला त्याचाच एक भाग म्हणून तो त्याच्या उदरनिर्वाहा पेक्षा अधिकचा पैसा विनाकारण धावपळ करून न मिळविण्याचा निर्णय घेतला. विजयाचे बहीण भाऊ खरे तर सुखी झाले पण नंतर जग ! ज्याला काही काम धंदे नसतात त्यांनी विजयाच्या आई - वडिलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली , मग ! मोठ्या मुलाचं लग्न कधी करताय ? तो लग्न का करत नाही ? काही अडचण आहे का ? मुलगी भेटत नाही का ? त्याच कुठे बाहेर आहे का ? होत का ? मग तेव्हा विजयच्या आई- बापाला विजयच्या लग्नाची आठवण आली आणि मग धावाधाव, त्याला मानसिक त्रास द्यायला सुरुवात त्यावर विजयने एक रामबाण उपाय शोधला पैसे कमावणे आणखी कमी केले. तो फक्त स्वतः पुरतेच कमवू लागला त्याच्या हातातील नोकरी सोडून बसला आणि त्याच कंपनीत पार्ट - टाईम काम करू लागला. विजयचे सारे सुरळीत सुरु होते अशात त्याचा लहान भाऊ कुटुंबापासून वेगळा झाला त्यांनतर जगासमोर असे चित्र उभे राहिले कि विजय बेकार आहे आणि त्याचा बाप त्याला पोसतोय ! पण विजयने लोकांचा हा गैरसमज दूर केला नाही उलट तो सर्वदूर पसरवू दिला कारण तो बेकार आहे हे सिद्ध झाल्यावर कोणाला आता त्याच्या लग्नात रस नव्हता. हळूहळू भावाने आणि बहिणीने आपल्या संसारात अधिक रमण्यात धन्यता मानली. मग तू काही करत का नाहीस ? जग बघ किती पुढे गेलं ? जगाकडे बघ कशा गाड्या - घोडे आहेत ! तू आता यापुढे कधी काय करणार ? लग्न नाही केलस तुझं जीवन वाया गेलं, जन्माला येऊन काहीतरी म्हणजे लग्न करायला हवं ! हा उपदेश विजयचा अशिक्षित बाप विजयला देत होता ज्या विजयाचे विचार जाणून घेण्यासाठी मोठं मोठे विद्वान उत्सुक असतात. साऱ्या जगाने ज्याचे हजारो विचार वाचले त्याला त्याचा बाप प्रश्न विचारतो ? कोण ओळखतो तुला ? तुझ्या सोबत असणाऱ्या चार मित्रांव्यतिरिक्त ? पुस्तकांना रद्दी प्रमाणपत्रांना कचरा आणि सन्मानचिन्हाना भांगार म्हणणारा बाप आणि आई तू इतकी वर्षे लिहतोयस टी.व्ही.वर कधी दिसणार ? या एकाच प्रश्नात गुरफटलेली . तिला याची कल्पनाच नव्हती आपण आपल्या नकळत या जगाला एक असामान्य व्यक्ती दिला आहे. विजयच्या सभोवतालची सारीच माणसे स्वार्थात लपेटलेली होती. ती त्यातूनच कधीच बाहेर येणार नाहीत याची विजयला खात्री होती त्यामुळे विजयने स्वतःला त्यांच्यापासून मुक्त केले. त्यांना काय वाटेल वाटत असेल हे विजयासाठी गौण होत. आज दहा वर्षानंतर जेव्हा विजयावर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेळ आली तेव्हा त्या पायांना बळ मिळावं म्हणून विजयाच्या आग्रहाखातर तिने पूर्ण केलेले बारीवीपर्यंतचे शिक्षणच कामी आले होते तेव्हा तिला विजयची आठवण आली नाही कारण तिच्याच नाही तर सर्वांच्याच डोक्यात हे आहे की विजयचा तिच्या प्रेमाला विरोध होता पण विजयचा चुकीच्या गोष्टीना विरोध होता. आज एक विचारवंत म्हणून विजय स्वतःला काही प्रश्न विचारतो त्याने विजयाचे प्रेम अयशस्वी व्हावे म्हणून प्रयत्न का केले नाहीत ? त्याचे जिच्यावर जीवापाड प्रेम होते तिच्यासोबत लग्नाला नकार का दिला ? तो लेखक कसा झाला ? खरतर उद्योगपती होण्यासाठी आवश्यक असणारे सारे गुण त्याच्यात होतेच आणि रक्तातही होते. एक डझन मुली त्याच्या आयुष्यात आल्या पण एकीनेही स्वतःहून माझ्याशी लग्न करणार का म्हणून विचारले नाही ! विजयच्या लहान भावाचे लग्न झाल्यावर सहज उत्सुकता म्हणून एका जगप्रसिद्ध ज्योतिष्याला त्याने आपली पत्रिका दाखवली तर त्याने तुझे लग्न होणारच नाही आणि झाले तर टिकणार नाही असे सांगितले. त्यांनतर आता जेव्हा विजयच्या नाका तोंडात पाणी जायला लागले तेव्हा त्याने स्वतः ज्योतिष्य शास्त्रचा थोडा अभ्यास केला आणि त्याला लक्षात आले की विजयाचे लग्न हे भविष्यात घडणाऱ्या एका घटनेशी जोडलेले होते म्हणून ते घडले आणि त्याचे वागणे हे त्याच्या सभोवतालच्या लोकांनी केलेल्या चुकांचे फळ होते. विजयचा जन्म महान व्यक्ती होण्यासाठीच झाला होता त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेले असामान्य जगणे साऱ्यांच्याच वाट्याला येत नाही. आता अज्ञान दूर झाल्यावर विजयच्या मनात कोणाबद्दल काहीच शिल्लक नव्हतं. तो शांत झाला होता, अबोल झाला होता, तपस्वी झाला होता आणि भविष्य जाणता झाला होता...


Rate this content
Log in