थोडं मनासाठी....
थोडं मनासाठी....


मनात कधी-कधी असंख्य वादळं निर्माण होतात. मन आणि बुद्धीचा संघर्षही होतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी वेळ येतेच ज्यावेळेस निर्णय घेण्यात आपली फार पळता भुई होते...
हो ना?
त्या मनाला एक सांगावेसे वाटत आहे.
प्रिय मना,
घे श्वास जरा, घाई नको रे करू कुठलाच निर्णय-
आयुष्य फार मोठं आहे तुझ्या ध्येयासाठी, खचू नकोस पाऊल टाकताना-
आयुष्यात अनेक भेटतील असे तुझा निर्णय बदलू पाहणारे, पण तू मात्र तुझ्याच मतावर ठाम राहा-
असू दे न तुझ्या मताला थोडी किंमत, प्रत्येकवेळी बुद्धीलाच का करू द्यावी ती हिंमत-
तू तुझा मान राखायला शिक जरा, जगाचं काय ते स्वतःच्याही मनाला कित्येकदा खालीच झुकवतात-
सामान्य होऊन जगण्यापेक्षा असामान्य होऊन जग,
तुझी महत्वाकांक्षा तुच जप मग बदल होईल बघ-
शेवटी रे एकच दुसर्याचं नाही तर आधी स्वतःचं व्हायला शिक....
कळतंय ना मना?