भावनिक प्रतिकारशक्ती
भावनिक प्रतिकारशक्ती


आपल्या आरोग्याची प्रतिकारशक्ती वाढवा
हे आपण आता काही महिन्यांपासून खुपच वेळा ऐकतो आहोत..
आधीही प्रतिकारशक्तीचा आग्रह होताच पण तो विषय आता खुप जिव्हाळ्याचा झाला आहे..
त्यातच काल/परवा मी ब्रह्मकुमारी शिवानी यांचा छान असा लेख वाचला 😊
तेव्हा त्यांनी सांगितलेला भावनिक प्रतिकारशक्ती कशी व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची आहे हे छान प्रकारे सांगितला.
✨भावनिक प्रतिकारशक्ती ✨
आपण जसे पौष्टिक अन्न आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खातो, ज्या पौष्टिक अन्नामुळे आपली दिवसभराची कामे उत्तमरीत्या पार पाडतो त्याच प्रकारे आपल्या मनात सेकंदाला येणारे विचार आपल्या अवतीभोवती सकारात्मक /नकारात्मक आभा (Aura) निर्माण करतात.
खरच आहे आपल्यापैकी कित्येकजण सतत नकारात्मक विचारसरणी जोपसणार्यांना आसपास बघत असतो पण यात त्यांचा दोष नसतोच दोष असतो तो त्यांच्याच मनातील विचारांचा जे ते ऐकून त्या व्यक्तिभोवती असा नकारात्मक Auraनिर्माण करतात!!!
जेव्हा अशी व्यक्ती त्या विचारांतुन बाहेर पडून सकारात्मक व्यक्तींमध्ये, त्या वातावरणात मिसळते तेव्हा तिच्या मधील तो सकारात्मक बदल हेच सांगतो की तेव्हा तिच्याअवतीभोवती फक्त सकारात्मक कंपणे निर्माण झाली असतात..
मग कशी वाढवायची आपण ही भावनिक प्रतिकारशक्ती??
सोप्प आहे हो 😊
१) झोपेतुन उठल्यावर सतत स्वतःला सकारात्मक सुचना द्या.
२) चुकीच्या व्यक्ती, चुकीचे विचार यांकडे दुर्लक्ष करा.
३)आपण काहीतरी छान करू शकतो यावर कायम विश्वास ठेवा.
४) आपल्याला आनंदी पाहू वाटणारेच लोक आपल्या आजूबाजूला आहेत हे मनात बिंबवा.
५) आपला जन्म काहीतरी प्रभावी करण्यासाठी झाला आहे हे कायम लक्षात असु द्या .
६) त्या देवाने प्रत्येकाला काहितरी उत्तम कार्य करण्यासाठी या पृथ्वीवर जन्माला घातले आहे यावर दृढ विश्वास ठेवा 😊✨
या सकारात्मक विचारांनीच आपली भावनिक प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल हे नक्की 😊✨!!
मग चला तर आपली आरोग्याची प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच भावनिक प्रतिकारशक्ती सुद्धा वाढवु म्हणजे या पृथ्वीवर नकारात्मकतेचा लवलेश नष्ट होऊन फक्त सकारात्मकतेचाच Auraअसेल आणि आपण आपल्या आयुष्यातील सकंटांचा सामना करायला सज्ज होऊ शकू.
हो की नाही? 😊✨