Kranti Shelar

Others

2  

Kranti Shelar

Others

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

2 mins
581


मानसिक आरोग्याविषयी आपण सारेच बोलत असतो. पण ते माहित जास्त त्यालाच असतं ज्याने ते डोळ्यासमोर बघितलेलं असतं! असे खूप लोक आहेत की जे काही ना काही आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगायला बघतात पण नाही सांगत आणि मग याच न्यूनगंडाचा मनात एक दिवस इतका अतिरेक होतो की... आहेच मग डिप्रेशन, टेंशनसारख्या समस्या हे कमी तर शेवटी आत्महत्या!  

    मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धीचे कारण

    मोक्ष अथवा बंधन। सुख समाधान ईच्छा ते।।

     - संत तुकाराम 

संत तुकारामांनी आधीच म्हणून ठेवलयं सगळ्या गोष्टी मनामध्ये तयार होतात. प्रेम, जिव्हाळा, त्याग, वैमनस्य सगळं सगळं मन तयार करतं!मग कधी हा समस्यांचा मित्र आपल्याला इतकं जवळ करतो की आपसूकच तो त्याच्या मित्राला म्हणजेच मानसिक त्रासाला आपलं स्वास्थ्य बिघडवायला आमंत्रण देतो! मग काय याचं पटलं तर शेवटी डिप्रेशन आणि डिप्रेशन असह्य झालं की आत्महत्या! खरंच आपलं मन आपला मित्र असतो हे जितकं खर आहे ना तितकच तो आपला जीव घेणारा शत्रूसुद्धा ठरतोच! मग हे मानसिक स्वास्थ्य स्वतःचही ढासळू न देणं किती महत्त्वाचं आहे समजलंच असेल.

 

नाण्याची एक बाजू बघून कसं चालेल? आपलं स्वास्थ्य चांगलं रहावं यासाठी आपण कायम प्रयत्नशील असतो पण... पण दुसऱ्याचंही ते कायम स्वस्थ रहाणं ही कुठेतरी आपलीही नैतिक जबाबदारी आहे. काय मिळेल हो कोणाचा आत्मविश्वास कमी करून? फार तर त्याचा उत्साह कमी होईल बस्स? अहो, आपल्या जसं सकारात्मक विचारांचा घट्ट प्रभाव समोरच्यावर पडतो ना तितकाच आपल्या नकारात्मक विचारांचाही प्रभाव त्याच्या तना-मनात अकारण भीती निर्माण करत असतो. त्यात तुम्ही कायम संपर्कात असाल तर त्याला श्वास घेणंसुद्धा अवघड होत असणार हे नक्की! तो बोलला नसेल तुम्हाला कदाचित तुम्ही नकळत बोलून गेला असाल पण लक्षात ठेवा ती व्यक्ती नंतर याचा विचार करून अस्वस्थ होते हं! शेवटी काय हो, आपण जितकी आपल्या मनाची काळजी घेतो ना तितकीच समोरच्याच्या पण मनाची घ्यावी इतकंच म्हणजे कोणी सुशांत आत्महत्या करणार नाही! 


कधी तुम्हाला वाटलं समोरचा टेंशनमध्ये दिसतोय तर जा ना त्याच्यजवळ "जादूची झप्पी द्या' म्हणजे मस्त त्याच्याही नकळत तो या जगात किती महत्वाचा आहे हे त्याला पटवून द्या! 😊😊बघा तुमचा पण तो दिवस खूपच छान गेलेला असेल! मग लक्षात ठेवाल ना आजपासून? आपल्याबरोबरच समोरच्याचा पण मन जपायचं! 😊 हे नाही जमलं तर दुखावू तरी नाही याची तरी काळजी नक्कीच घेता येईल. कारण मन आहे हे कोणाचं खंबीर असतं तर कुणाचं हळव असत तर कुणाला काही फरक पडत नाही पण आपण जसं कोणाकडून दुखावले जाऊ नये यासाठी प्रयत्न करतो ना तितकाच प्रयत्न दुसर्‍याला न दुखावण्याचा केला तर या जगातून हि मानसिक रोगासारखी व्याधी कायमची संपुष्टात येईल!बरोबर ना? 

आणि राहिला आपल्या स्वास्थ्याचा प्रश्न. कायम स्वतःला सकारात्मक विचारांची प्रेरणा द्या! आपल्या आयुष्यात घडलेल्या सुखद आठवणी सोबत राहू द्या! आपण देवाची उत्कृष्ट कलाकृती आहोत हे कायम लक्षात ठेवा त्याने तुम्हाला काहीतरी करवून घेण्यासाठीच या पृथ्वीवर जन्माला आणलंय हे कायम लक्षात असू द्या 😊!!

मग चला जपू या मानसिक स्वास्थ्य स्वतःचे आणि सोबत इतरांचेही !😊


Rate this content
Log in