मी, बकरी आणि झोका
मी, बकरी आणि झोका


हसू आलं ना? हो आता मलाही येत आठवलं की... पण त्यावेळेस माझं जे झालं होतं ना विचारयलाच नको! सुट्टीमध्ये आपण सगळेच गावाला जातो तशीच मलाही फार हौस! त्यात आम्ही आजोबांना गावी गेल्यावर पहिला हट्ट करणार तो झोका बांधायचा पण जर भावंड जास्त जमलो असु तर एका झोक्यावर कसं भागणार ना?.. मला तरी असा निवांत एकटा लागयचा तो झोका फक्त माझ्यासाठीच!!
एकदा तर मी हट्टाने आजोबांना माझ्यासाठी वेगळाच झोका बांधयला लावला मग काय माझ्या आजोबांनी लगेच दुसर्या एका झाडाला छान अशी सावली शोधून माझ्यासाठी भरभक्कम असा झोका बांधला. पण मला काय ठाऊक की ती जागा त्या बिचाऱ्या बकरीची होती ती आपली शांत आपली निपचित झोपली होती. झोक्याचा ना तिला त्रास होता ना तिचा मला. पण माणसं कशी झोपेतून उठल्यावर त्यांना या जागेवरून त्या जागेवर बसायची सवय असते तसंच तिचंही असेल कदाचित ती झाडाला आपली गोल-गोल फिरु लागली. पण नाही म
्हटलं तरी झोक्याच्या आवाजाने तिला थोडंतरी अस्थिर केलं असेलच...
मी इकडे माझा झोका घेतेय तिकडे ति गोल फिरतेय......इकडे मी माझी गाणी माझ्याच धुंदीत म्हणतेय तिकडे ती तिच्या धुंदीत फिरतेय..... खरी गंमत तर पुढे आहे, झालं तिचे ते शिंग आले ना हो माझ्या दोरीत ....मग काय मला काही समजायच्या आत आणि ती मला बघायच्या आत आम्ही दोघी इतक्या गुंतल्या गेलो की ना तिला दोरीच्या बाहेर निघता येईना ना मला झोक्यावरून खाली उतरता येईना... तिला जाणवलं असेल कदाचित माझ्या रडण्याची चाहूल झाली असावी तिला तिने जोरात तिचे शिंग ओढले... आणि काय मी आपटली जोरांत खाली... दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसा खाली पायात काटाच शिरला. मी इकडे रडत होती, तिकडे बकरी शांत होती, समोर माझे भावंड मला हसत होते आणि आजही आठवलं की हसतात आणि मी ही खूप हसते कारण म्हणतात ना काळाबरोबर त्या वेळेची दाहकता कमी होत जाते तसंच काही!