आत्महत्या...
आत्महत्या...
हो थोडा धक्का बसला ना?
मलाही बसला होता एकदा, ज्यावेळी माझ्या मनाने आत्महत्या करणाऱ्यांविषयी
खूप विचारमंथन केले होते.....
असो विषयांतर नकोच आपण एक -एक पैलू बघू!
खरंच तुम्हालाही वाटते का की या लोकांचीच चूक असते बाकी सगळ्यांसारखेच.....?
एक दोन वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात एक बातमी आलेली तुम्ही कदाचित बघितली असेल त्यात मंथन या 6 ते 10 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली, विशेष म्हणजे त्याचे आईवडील प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना!
कारण खूप गंभीर नाही तर तेच एकाकीपणा!!
हो, आता आपण एकतर त्याला दोष देणार नाहीतर आईवडीलांना....
पण मी यात त्या कोवळ्या जीवाला दोष नाही देणार नाही त्याच्या आईवडीलांना.
मंथनमध्ये जरी न्यूनगंड असला तरी त्याच्या अवती-भवती असलेल्यांपैकी एकालाही त्याच्या वागण्यात संशय येऊ नये(त्याच्या आई वडिलांना सोडून)????
थोडं जरी त्याला शाळेत शिक्षकांकडून मायेचा ओलावा लाभला असता तर त्याच्या मनातील अंधारी वाट प्रकाशाने उजळून निघाली असती.....
मंथनच नाही असे खूप जण आहेत ज्यांच्या विषयी थोडीशी जरी हुलकावणी त्यांच्या आसपासच्या लोकांना लागली असती ना तर या लोकांनी आत्महत्या केलीच नसती!!!
कारण आत्महत्या करणारा /करणारी व्यक्ती या काळात खूप चंचल वागते. ती व्यक्ती स्वतःला त्या पासून दूर जाण्याचा खूप प्रयत्न करत असते पण एकटी असल्याने किंवा खुप दिवसांपासून अलिप्त राहिल्याने ते स्वतःहून कोणाशीही बोलत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात इतर विचारांसाठी एक दार बंद होते पण एक दार त्यांना मरणाकडे ओढत असते...
पण शेवटी कोणी नसतो न त्यांच्या आसपास, कोणाला वागण्यातली चाहूलही लागत नाही!
शेवटी मला हेच सांगायचे आहे आपल्या आजूबाजूला अचानक स्वतःचे वागणे बोलणे बदलेल्या लोकांना ओळखा!!
त्यांच्या नकळत मनात शिरायचचा प्रयत्न करा तेही नकळत कारण त्यावेळी ती व्यक्ती एक लहान बाळ असते मग कितीही मोठी असो!
आपणच अशा ओळखी-अनोळखी लोकांशी आपलेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला ना तर नाही करणार कधी कुठला मंथन आत्महत्या किंवा नाही सोडून जाणार कुठलाही शेतकरी त्याच्या कुटुंबीयांना, नाही करणार कोणी हिमांशू रॉय विचार आत्महत्येचा !!!!
बघा विचार करा पटतय का?
माझे म्हणणे काळजीपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद!!
