akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Fantasy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Fantasy

शक्तिमान

शक्तिमान

2 mins
349


कोरोनाच्या काळ अजून लोटला नाही जिथे तिथे त्याच्या परिणाम दिसतं आहे त्यात पत्रकार मंडळींना तर बातम्या मिळवण्यासाठी अश्या परीस्थित हि जीवाचं रान कराव लागत असाच आपला पत्रकार गंगाधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री हि कोरोनाच्या बातम्या गोळा करण्यात व्यस्त होता 

कोरोनाच्या बातम्यांनी गंगाधर च मन चलबिचल झाले पडणारे मुत्यूचे ढेर त्याला विचलित करून लागले विनाकारण होणारा त्रास संपवयलाच हवा असे त्याला वाटले आणि त्याच्यातला शक्तिमान कोरोनाशी दोन हाथ करण्यास सज्ज झाला.

पण ह्या अदृश्य विषाणू ला ओळखायचे कसे हा प्रश्न शक्तिमान समोर उभा राहिला.

शक्तिमान ध्यान अवस्तेत बसला आणि त्याला त्याचे गुरुदेवांची आठवण आली तो लगेच आकाशात उडत त्यांना भेटण्यासाठी गेला 

"नमस्कार गुरुदेव "

"आयुष्मान भव "

"गुरुदेव मला तुमची मदत हवी आहे जे आज काल चालू आहे ते थांबवलंय हवं "

"तुझी व्यथा कळते मला शक्तिमान साऱ्या जगावर त्याने राज्य केले आहे आणि निष्पाप बळी "

"गुरुदेव हे मला थांबव्याला हवं पण त्या अदृश्य विषाणू ला ओळखायचं कसं त्यावर काही उपाय "

"शक्तिमान तुला अदृश्य जप करावा लागेल जेणे करून तुला कुठली हि अदृश्य गोष्ट दिसेल पण हा जप तुला एका पायावर राहून पाच हजार वेळी जप करावा लागेल "

"जी गुरुदेव मी करिन तुमचा फक्त आशीर्वाद असावा /"

"माझा आशीर्वाद नेहमी तुच्या पाठीशी आहे वत्स "

शक्तिमान आकाशात झेप घेऊन घरी पोहोचला आणि जपास आरंभ केला 

काही तास लोटले शक्तिमान एका पायावर आणि तोंडात जप चालू होते एकदाचा जप संपला शक्तिमान ने मनोमन आपल्या गुरूंना वंदन करून मिशन कोरोना साठी बाहेर निघाला आकाशातून झेप घेताना त्याला एक घोळका आकाशात तरंगताना दिसला शक्तिमान त्याच्या समोर गेला त्यातला एक म्हणाला 

"काय रे मास्क घातलं नाही आणि आमच्या समोर येऊन उभा आहेस तुला काय कोरोना वाहायला हवा आहे का "?

"अरे म्हणजे तुम्ही तर ते विषाणू ज्यांनी सगळ्याच जीण मुश्किल केलंय "

"हो आम्हीच ते "

"कशाला छळ मांडला तुम्ही चालते व्हा "

"हा हा हा आम्ही चालते व्हयला नाही आलोय आमचा दरारा काबीज करण्यसाठी आलोय "

"बरं बोलाने निघून जा नाहीतर "

"नाहीतर काय करशील माणसं आमची गुलाम झाली आहे तू काय चीझ आहेस "?

"मी मी शक्तिमान वाईटाचा नाश करणारा "

"हा हा तू आमचं काहीही करू शकत नाही "

शक्तीमान डोळे बंद करतो आपल्या दुसऱ्या हाताने जादू करून जाळे त्या घोळक्यावर टाकले विषाणू ओरडू लागतात शक्तिमान ने वेळ न दवडता त्यांना दूर घेचत समुद्रच्या तळाशी नेऊन टाकले आणि वर आग लावली आणि तो परतला 

महिन्या भरात कोरोनाचा संपूर्ण नाश झाला हि बातमी लिहिताना गंगाधरचे दोन दात बाहेर येऊन हसत होते. त्याच्या हसण्याने माझे डोळे उघडले पण कोरोनाला संपवण्याचे स्वप्न मात्र पूर्ण झाले.


Rate this content
Log in