Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

शेतकरी मुलाचं बालपण

शेतकरी मुलाचं बालपण

1 min
48


आज आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो .माझ्या दोन बहिणी आणि मी, आई बाबा देखील आमच्या सोबत होते.


आईचे डोळे आज भरून आले होते गप्पा मारता मारता आम्ही बालपनाकडे वळलो होतो.आई जुन्या आठवणी सांगत होती. मी लहान होतो तेंव्हा गावाकडे आमची जमीन होती.


आई बाबा दोघेही शेतात जायचे मी लहान होतो,आई मला शेतात घेऊन जायची कारण मी तिच्याशिवाय राहत नव्हतो. मला झाडाला झोळी बांधून ती शेतातली कामे करायची .तिचे सगळे लक्ष माझ्याकडे ,अर्धे कामात असायचे.


हळू हळू मी मोठा होत गेलो आईने बाबाने शेती काम करून मला चांगल्या शाळेत घातले. दोन्ही बहिणीचे खेड्यात असल्यामुळे लवकर लग्न केले.


घरच्या गरिबी परिस्थितीची जाण असल्यामुळे मी मन लावून शिकत होतो आणि शाळेत पहिला नंबर घेत होतो.


कष्ट करणाऱ्या, दिवसभर राबणाऱ्या, आपल्या आई बाबांना चांगलं शिकून खूप सुख द्यायचं असा मी जणू विडाच उचलला होता.त्या स्वप्नाने मी चांगला आभ्यास करत होतो.आणि आई बाबा जोमाने काम करत होते.


चांगल्या कॉलेजमधून आता मी पास झालो आणि चांगल्या नोकरीला लागलो.शहरात घर घेतले .आई बाबांना तिथेच बोलून घेतले.जमिनीला बटाईदार लावून काम करून घेत होतो.


आई बाबा देखील खुश होते आज त्यांच्या घामाच कष्टाचं चीज झालं होतं.


ती तिच्या आठवणी आम्हाला सांगत होती .आम्ही शांततेत सगळं ऐकून घेत होतो .आईचे डबडबलेले डोळे मी पुसत आईला म्हणालो, आई आता तूम्ही आनंदात सुखात राहायचं गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.


Rate this content
Log in