Shital thombare

Others

5.0  

Shital thombare

Others

रिश्ता वही सोच नई...

रिश्ता वही सोच नई...

4 mins
776


सुप्रिया एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी....घरात आईबाबा,आजीआजोबा आणि छोटा भाऊ जतीन....सर्वसामान्य असं कुटुंब. घरात सत्ता आजीआजोबांची...घरचा मुलगा म्हणून वडीलांचा घरात रुबाब...जतीन तो तर वंशाचा दिवा..घरातल्यांचा सर्वात लाडका...राहता राहिल्या सुप्रिया अन तीची आई...घराची सगळी जबाबदारी सुप्रियाच्या आईच्या खांद्यावर...कारण ती गृहिणी...सासूसासरयांच पथ्यपाणी असो..की नवर्याचा डबा,मुलांची शाळा,अभ्यास,मिटींग सारं काही सुप्रियाच्या आईलाच पहावं लागे....


ऑफीसमुळे बाबांना वेळ नाही...अन आई काय घरीच असते मग....सगळ्या जबाबदारया सुप्रियाच्या आईवर...हेच सारं पाहत सुप्रिया लहानाची मोठी झाली...आई सगळं काही पाहते पण तरीही जरा काही चुकलं की सगळेच तिला बोलतात..तिच्या चुकांचा पाढाच वाचू लागतात...आणि सगळ्यांच पाहून आता छोटा जतिनही आईला उलट उत्तरे देऊ लागला..


सुप्रियाला सगळ्यांचा खूप राग यायचा..आई तू का म्हणून सगळ्यांच ऐकून घेतेस?...माझ्या मैत्रिणींच्या आया बघ ...घरात सगळं त्यांचच चालतं..आणि आपल्या घरात सारं काही तू करतेस...पण त्याच क्रेडिट मात्र तुला कधीच मिळत नाही...


सुप्रियाची आई यावर सुप्रियालाच समजवायची ...असू दे गं...घर म्हटलं...संसार म्हटला..की हे सगळं चालणारच ..तुझे बाबा जर घराची आर्थिक बाजू सांभाळतात...तर त्यांची पत्नी म्हणून मला इतर जबाबदारया पार पाडायलाच हव्यात...आजीआजोबांच म्हणशील तर सासुसासरे आहेत ते...ते त्यांची भूमिकाच पार पाडतायत..तू नको मनाला लावून घेऊस..जे आहे त्यात मी खुश आहे ...आणि आता मला या सगळ्याची सवय झाली आहे...


'ए आई काय ग तू अशी ..मुळमुळीत हो की थोडी ड्याशिंग...मला नाही आवडत जेव्हा तू सगळ्यांच बोलण ऐकतेस..


'म्हणजे मी तुला आवडत नाही की काय..?.. सुप्रियाची आई म्हणाली...


तसं नाही ग आई you are the best mamma.खूप आवडतेस तू मला..पण तुझा हा मुळमुळीत स्वभाव नाही आवडत...


हे बघ बेटा मी जेव्हा माप ओलांडून या घरात आले..तेव्हा माझ्या आईने मला कानमंत्र दिला..बाईची जात जन्माला येते तेच सोशिकपणा घेऊन... त्या जोरावरच जगायचं...आणि संसाराची खिंड लढवायची...आईचे ते उपदेशाचे डोस घेऊनच मी या घरात आले ...आई म्हणाली अगदी तस्स वागत राहिले...


म्हणून तर या घरातल्या वादांचे आवाज बाहेर पडत नाहीत कारण ते एकतर्फी असतात...


याचा अर्थ चूक तुझी नाही आज्जीची आहे तर...दोघीही एकमेकींकडे पाहून हसू लागल्या...


सुप्रिया कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती...परिक्षा झाली अन तिच्या लग्नाचे वारे घरात वाहू लागले...तिला इतक्यात लग्न करायच नव्हतं...पण घरात तिच ऐकत कोण...तिने आईला सांगितलं...मला पुढे शिकायच आहे ...आत्ताच लग्न नाही करायचं...पण आईच घरात काही चालत नव्हतं...इच्छा असुनही ती आपल्या लाडक्या लेकीसाठी काही करु शकली नाही...


वडिलांच्याच मित्राच्या ओळखीने सुप्रियासाठी राघवचं स्थळ आलं...मुलगा ब्यँकेत कामाला..घरी सासू सासरे,ननंद अन राघव असं चौकोनी कुटुंब होतं...दोन्हीकडच्या मंडळीची पसंती झाली अन...महिन्याभरातच लग्नाचा बार उडाला...


सुप्रियाच्या आईने लेकीला निरोप देताना पुन्हा कानमंत्र दिला...'बेटा आता तेच तुझ घर आहे ...सासरच्या माणसांना धरुन रहा ...आता तिच तुझी माणसे आहेत...'


माहेरचे संस्कार आणि तिथल्या वातावरणाची शिदोरी सोबत घेऊन सुप्रियाने सासरचा उंबरठा ओलांडला...मनात भितीच काहूर माजलेल्ं..नव्या नवरिची नवलाई अन शंका कुशंकांच सावट...मनावर चढलेलं...दबकतच तिने गृहप्रवेश केला...


सासुबाइनी तिच्या चेहर्यावरिल भाव ओळखले...घरातील देवतांचे दर्शन घ्यायला लावले...सुप्रियाला जवळ बोलावून तिला आधी कपडे बदलायला सांगितले...


"सकाळपासून दमली असशील साडीच्या ओझ्याने ...जा जरा फ्रेश हो.."


सुप्रियाला सासूच्या या प्रेमळ शब्दांच आश्चर्य वाटलं...तिच्या माहेरी सासू सुनेचा असा प्रेमळ संवाद तिने कधी ऐकला नव्हता...सुप्रिया कपडे बदलून बाहेर आली..


" अगं हे काय पुन्हा साडी का नेसलीस ड्रेस घातलास तरी चालेल ..." सासूबाई म्हणाल्या..


" पण मी सोबत ड्रेस नाही आणले...आई म्हणाली लग्नानंतर तुला साडीच घालावी लागेल..." सुप्रिया म्हणाली..


सुप्रियाची सासू हसली...आपल्याकडे अस काही नाही...तू ज्यात कम्फर्टेबल असशील ते घाल...आणि ड्रेस आणला नसशील तर रिचाचे( सुप्रियाची ननंद) कपडे आहेत ...त्यातल काही घाल ...तुला आवडेल ते...काही हरकत नाही...


सुप्रियाने रिचाचा ड्रेस घातला...सकाळ पासूनच्या दगदगीने ती पार थकून गेली होती...ड्रेस घालून फ्रेश झाली...तिला फारच हलकं वाटलं...


इतका वेळ मनावर ओझ घेऊन वावरत होती..सासूच्या प्रेमळ बोलांनी तिच्या मनावरच दडपण नाहीसं झालं...मोकळेपणाने सुप्रिया घरात वावरु लागली...


दुसरया दिवशी आईने सांगितल्या प्रमाने... सूप्रिया लवकर उठली..आवरून करून किचनमधे गेली...तो सासूबाई आधीपासूनच हजर होत्या...तिच्या हातात गरम गरम चहाचा कप ठेवत ...त्या म्हणाल्या " तू का आलीस किचन मध्ये...आज तू काही काम करायचं नाही...मी आहे सगळं पहायला..आणि यापुढे हे सगळं तुलाच सांभाळायचय ...मग कामाची घाई कशाला...आज मस्त आराम कर.. नवी नवरी आहस आनंद घे या क्षणांचा नव्या नवलाइचा"


सुप्रिया आपल्या सासुकडे पाहतच राहिली...तिचे डोळे डबडब ले..पण तिने स्वत: ला सावरलं..


सकाळच्या चहापासून ते रात्री जेवनापर्यंत सगळं कुटुंब एकत्र होतं..ना कसला बदेजाव पणा..ना कसले ढोंग..सुप्रियासाठी हे सारं अमृताहुनी गोड होतं...ज्याची अपेक्षा ती इतकी वर्ष ... आपल्या आईसाठी करत होती...ते सारं न मागता तिला मिळाल होतं...भाग्यच म्हणायचं आपलं सुप्रिया मनाशीच म्हणाली...


इतक्या मोकळ्या वातारणात रमायला सुप्रियाला वेळ लागला नाही...दोनच दिवसात घरातल्यांनी सुप्रिया अन राघव ला गोव्याची तिकिट देऊन छान सरप्राईज दिलं...सुप्रियाच्या नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले...


सासुबाइनी नेमकं हे हेरलं...त्यानी सुप्रिया ला विचारले काय झाले बेटा आमचं काही चुकलं का?.. सासूच्या आपुलकीच्या स्पर्शाने सुप्रिया ला भरुन आलं...तिने माहेरची सारी परिस्थिती सांगितली...


सुप्रियाची सासू म्हणाली" बेटा तुझ्या माहेरचि परिस्थिती आपण नाही बदलू शकत..पण आपल्या घरात ते वातावरण कधीच निर्माण होणार नाही..शेवटी नाती जपायची जबाबदारी ही प्रत्येकाचीच असते...


     रिश्ता वही सोच नई...


(कथा आवडल्यास लाइक करा शेअर करा पण लेखिकेच्या नावासहित)


Rate this content
Log in

More marathi story from Shital thombare