Shital thombare

Others

3  

Shital thombare

Others

देर आये पर दुरुस्त आये....एक प

देर आये पर दुरुस्त आये....एक प

4 mins
593


साठीला पोहचलेले सावंत आजोबा सकाळी मॉर्निंग वॉक ला गेले ते अजून घरी पोहचले नाहीत...सावंत आजी काळजीत होत्या...नेहमी वेळेत घरी येणारे सावंत आजोबा आज  इतका उशीर झाला तरी घरी आले नाहीत ?...सावंत आजींची काळजी आणखीच वाढू लागली...


सावंत आजोबांच्या सर्व मित्रांना फोन केले ...पण पार्कातून सावंत आजोबा मित्रांची रजा घेऊन केव्हाचेच निघालेले...न रहावून सावंत आजींनी जवळपास राहनारया काही नातेवाईंकाना फोन लावला..पण सावंत आजोबांबद्दल कोणालाच काही माहित नव्हते...


शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांत तक्रार नोंदवायची अस ठरवून सावंत आजी घरातून बाहेर पडल्या...पायात चप्पल चढवली...दार बंद करनार इतक्यात मागे कोणीतरी शीळ घालत आहे हे जाणवल...सावंत आजींनी दचकून मागे पाहिलं...तो सावंत आजोबा समोर उभे...


सावंत आजोबांना पाहून सावंत आजींच्या जीवात जीव आला..पण चेहर्यावर राग दाखवत...त्या सावंत आजोबांवर चांगल्याच चिडल्या...ही काय वेळ आहे घरी यायची...जीव काकुळतीला आला होता माझा...काय करु अन काय नको अस झालं...सगळ्याना फोन करून झाले...शेवटी पोलिसात निघाले होते ....तक्रार नोंदवायला....उद्या पासून तुमच ते मॉर्निंग वॉक का फॉर्नींग वॉक सगळं बंद...जायच असेल तर मी पण येणार तुमच्या सोबत...सावंत आजी एका दमात सगळं बोलून गेल्या...


सावंत आजोबा मात्र आजी कडे पाहून मंद स्मितहास्य करत होते...ते पाहून तर सावंत आजी आणखिनच चिडल्या...मी इतका वेळ एकटी बडबडतेय अन तुम्ही हसताय काय...जीवाला घोर लावून कुठे गेला होतात...


सावंत आजोबा गुडघ्यावर एक पाय वाकवून बसले...तशी पायात न कमरेत कळ आली...पण चेहर्यावर तसं न दाखवता...इतका वेळ मागे लपवलेला हात पुढे केला...त्यात पिवळी धम्मक चाफ्याची फूलं होती...त्या फुलांचा सुवास चौफ़ेर घुमू लागला...


आता हे काय नवीन तुम्हाला पाठीच दुखणं आहे...माहीत आहे न ...अगदी बावीस वर्ष्याच्या मुलासारखं बसलात गुडघ्यात वाकून...आणि ही फूलं बिलं काय प्रकार आहे...सावंत आजी म्हणाल्या...


फूलं बिलं काय म्हणतेस ...तुझी आवडती चाफ्याची फूलं आहेत...किती शोधली सांगू बाजारात....सगळा बाजार लाल गुलाबांनी भरलाय....पण तुला आवडतात म्हणून खास आणली आहेत...शोधून...अगदी जग जिंकल्याच्या आविर्भाव आणत ....सावंत आजोबा म्हणाले


ते ठिक आहे ...पण आज कसलं औचित्य साधून आणलित फूलं...कारण देवपूजा सकाळीच उरकली आहे...आज कसला सण नाही की...कोणाचा वाढदिवस नाही...मेलं वाढदिवस असला तरी तुमच्या लक्षात राहतं कुठे... मलाच मेलीला तुम्हाला तो आठवण करुन द्यावा लागतो...इति सावंत आजी म्हणाल्या


माझ्या स्मरणशक्ती वर जाऊ नको बरं...मी तर मुद्दाम विसरण्याचं नाटक करतो...तुला त्रास देण्यासाठी..आणि तू नको ते विषय काय घेऊन बसली आहेस...अगं आज प्रेमाचा दिवस आहे...व्ह्यलेन्टाइन डे...आहेस कुठे...सावंत आजोबा उत्तरले 


मी इथेच आहे ....पण तुम्ही हे काय नवीन फ्यड काढलतं...आपलं काय वय आहे हे असले डे साजरे करायला...


तोपर्यंत सावंत आजीनी ओंजळीतील फुलं देवघरात नेली... देवाला फूलं वाहून दोन फूलं स्वत: च्या केसात माळायला घेतली...तोच सावंत आजोबांनी आजीच्या हातून फूलं घेऊन ती आजीच्या केसात माळली देखील...


सावंत आजी लाजल्या हे काय लावलय आज तुम्ही....शोभत का आपल्या वयाला हे...कोणी पाहिलं तर काय म्हणतील....


काय म्हणतील म्हणजे या वयातही माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ....हेच म्हणतील सारे ...काही जण तर उगाच जळतील तुझ्यावर...


काहीतरीच तुमच... आज काय हे प्रेमाच भूत घेऊन बसला आहात...कोणी धरलं बिरलं नाही ना तुम्हाला...इतक्या वर्षात कधी सुचलं नाही तुम्हाला... 


काहीही काय बोलतेस गं...भूत बीत काही नाही...इतक्या वर्षात जे नाही सांगता आलं..जे नाही बोलता आलं...ते आज मी बोलणार आहे...


तू या घरात आलीस...अन या घरचीच झालीस ...आई विना पोरके असणारे आम्ही भावंड...सगळ्यानाच आईची माया लावलीस...माझ्या लहान भावंडांना आईची कमी भासू नाही दिलीस ...इतकच काय माझ्या साठी आई आणि बायको दोन्ही झालीस...


माझ्या भावंडाना मार्गी लावलस...आपल्या मुलांना सक्षम बनवलस...संस्कार दिलेस...यात मी कुठेच नव्हतो..पैसा कमावण्याचा नादात तुला सुख द्यायचं विसरूनच गेलो...तू कधी तक्रार नाही केलीस...की मी कधी समजून नाही घेतलं...मला वाटत होतं ते तुझ कामच आहे...तुझा संसार आहे...इतकी वर्ष तुझ्याकडून फक्त अपेक्षा ठेवत आलो...


पण आता वाटतयं सारया जबाबदार्या पेलताना ...तुला समजून घेत प्रेम व्यक्त करायला हवं होतं...वेळ अजूनही गेली नाही ...उरलेले सारं आयुष्य बंदा आपकी खिदमत में हाजिर हैं...राणी साहेबा...


सावंत आजोबांच हे नव रूप पाहून ....सावंत आजी मनोमन खुश झाल्या...आजोबांना टोमणा देत म्हणाल्या...देर आये पर दुरूस्त आये...ये भी हमारे लिये कम नही...


आज सावंत आजोबांनी स्वत:च्या हाताने आजीसाठी तिच्या आवडीची सोलकढी बनवली...संध्याकाळी मस्त दोघे पार्क मध्ये जाऊन आले...रात्री बाहेर जेवण...दिवस कसा मजेत गेला...


रात्री झोपताना सावंत आजी खुश होत्या...पण सावंत आजोबा खूप मोठ्या धक्क्यातून बाहेर पडल्यासारखे वाटत होते...खर तर आज या सगळ्या उठाठेवी मागे कारण ही तसच होतं...


रात्री सावंत आजोबांनी स्वप्न पाहिलं....सावंत आजी त्यांना सोडून गेल्या...दचकून उठले तो आजी शांत झोपलेल्या...तेव्हाच सावंत आजोबांनी ठरवलं...जे इतक्या वर्षात नाही हिला देऊ शकलो ते आता द्यायचं...


शेवटी दूर जाण्याच्या कल्पनेने .... सावंत आजोबा आणि आजिचं प्रेम नव्याने फुललं...तुम्हीही तुमच अव्यक्त प्रेम व्यक्त करा...कारण आपल्या हाती फक्त आज आहे उद्याच कोणाला माहित.......


(कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा पण लेखिकेच्या नावासहित)


Rate this content
Log in