AnjalI Butley

Children Stories

4.3  

AnjalI Butley

Children Stories

राघू

राघू

3 mins
355


राघू, राघू अरे कुठे चालला आहे? कुठे नाही इथेच आहे अंगणात, खेळतो आहे, फुलपाखरू बघतो!

राघू १०वर्षाचा आहे, पण त्याला फुलपाखरांच्यापाठी धावायला आवडत! फुल झाडांशी खेळतो, ते कसे वाढतात, कधी कोणत्या झाडाला फुले येतील हे बघत असतो, शाळेत जातांना आईकडन हमखास एक गुलाबाच फुल तोडून घेतो कारण फुल तोडतांना काटे टोचतात हाताला! शाळेतील बाईंना द्यायच असत ते फुल त्याला!

कॉमिक्स आवडतात त्याला वाचायला, कार्टून बघायला आवडत टिव्हीवर, छोटा भिम, शक्तिमान आवडत, मग काय आपल्या बाबांना तस करायला सांगणे हा त्याचा छंदच जणू, शाळेत मित्रांना आपले बाबा कसे सुपर डूपर आहे हे सांगतो मग काय मित्रांमध्ये चढा ओढ! कोणाचे बाबा कसे सुपर हिरो आहे ते! 

एका मित्राला , आनंदला बाबा नाही पण त्याने आपली आई कशी बाबांसारखीच हिरो आहे हे सांगतो!

मुल त्याला चिडवत असतात, आई कशी सुपर हिरो असणार ती तर बाई आहे.. सुपर मॉम म्हणायच का तुला, तुला बिन बाबांचा, त्यांच्यातील भांडण शाब्दिक वरून मारामारीवर गेली, राघूने मध्यस्ती केली! आनंद दुःखी झाला रडू लागला, भांडण संपले पण तो आपल्याला बाबा नाही म्हणून दुःखी झाला, आज घरी गेल्यावर आईला बाबांच्या बद्दल विचारू, 

त्याच्यासाठी त्याची आई सुपर डूपर होती ती त्याला आईबाबा बणून त्याला काय हवे काय नको ते सर्व करायची तो खूप आनंदी असायचा, पण आज शाळेतील मित्रांनी चिडवल म्हणून दुःखी झाला!

छोटेच मुल आहे पण त्यांची अक्कल बरीच वरची कुठून एवढी अक्कल येते कोण जाणे, आई पण थोडी दुःखी झाली, आनंदचे डोके आपल्या मांडीवर थोपवटत त्याला समजवत होती व स्वतः स्मरणरंजनात गेली.

आनंद पोटात असतांना एका लग्नाला जात असतांना त्यांच्या बसचा अपघात झाला होता व इतरांना वाचवतांना त्यांचाच मृत्यू झाला होता, मीपण शुद्धीवर नव्हते, नक्की काय झाले तेंव्हा हे माहितीच नाही मला, आनंद पोटात आहे म्हणून जगण्याला अर्थ लावत जगले, व त्याचा जन्म झाला, नाव ठेवतांना आनंद हे नाव ठेवले की त्यामुळे आपण जगत आहोत आनंदी राहायला हवे म्हणून.

आनंदच्या बाबांचे निधन झाले तेंव्हा त्यांनी त्यांचे डोळे दान केले होते. त्यांना फुलपाखरे आवडायचे ते त्यावर अभ्यास करत होते!

आईने आज न रडता हे सगळे आनंदला सांगितले कारण मुलांनी त्याला बिन बाबांचा म्हणून चिडवू नये, यांनी त्यांचे डोळे दान करत कसे समाजातील लोकांपुढे एक चांगले उदाहरण ठेवले होते.

आनंद आज शाळेत खुशीत गेला, मी मित्रांना माझे बाबापण कशे सुपर डुपर हिरो होते ते सांगणार, मी पहिले राघूला सांगणार मग बाकीच्यांना, 

धावत धावत तो राघू जवळ गेला व त्याला आपल्या बाबांची गोष्ट सांगीतली, राघू पण याया आनंदात मिसळून दोघेही उया मारू लागले, सुपर डूपर करत!

राघूने घरी गेल्यावर आपल्या आईला सांगितले, आईने आम्हाला आनंद व आनंदच्या आईला भेटायचे आहे, आजच भेटू म्हणत, राघूने आनंदला आम्ही तुया घरी येतो थोड्या वेळात, माझ्या आई-बाबांना तुझ्या आईला भेटायचे आहे.

राघू, आनंदचा मित्र वयाने आनंद पेक्षा मोठा आहे. तो जन्मताच एका डोळ्याने अधू होता, त्याचे आई बाबा दुःखी होते, ते खुप प्रयत्न करत होते राघूचा डोळा निट करयासाठी, तो पाच वर्षाचा झाला तेंव्हा एका दात्याचा डोळा त्याला मिळाला होता. 

राघू, राघूचे आई बाबा आनंदया घरी पोहचली, गप्पा मारत असतांना राघूच्या आईने राघूच्या डोळ्या बद्दल सांगितले. तो डोळा आनंदच्या वडिलाचा आहे!

एकदा तुम्हाला भेटावे वाटत होते पण आज तो योग आला!

आनंद व रघूला आजच हे सगळे समजले!

आनंद आता राघूलाच आपला सुपर डूपर हिरो समजायला लागला, कारण याच्या बाबांचा डोळाराघूचा डोळा होता आता व राघू त्याया बाबांसारख फुलपाखरांवर प्रेम करतो त्याच्यापाठी फिरतो!

सुपर डूपर हिरो सोबत असल्यामुळे आनंद खुश होता व राघू आपल्याला आनंदच्या बाबांचा डोळा मिळाला म्हणून आपण छान बघू शकतो म्हणून!

असे हे एकमेकांचे सुपर डूपर हिरो मित्र!!



Rate this content
Log in