Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

प्रेमाचा शब्द आई🌹

प्रेमाचा शब्द आई🌹

2 mins
249



सुजाता ही तशी हुशार कष्ट करणारी, प्रेमळ आईची काळजी घेणारी, पण मुलगी घरी ठेवण्याची वस्तू नाही तिला कधी न कधी सासरी जावंच लागत.


सुजाता मोठी झाली तस तिचंही लग्न करण्याचा ठरवलं.लग्न झालं सासरची मांणस चांगली मिळाली.हळू हळू दिवस सरले.


सुजाताला एक गोंडस मुलगा झाला.सार्थक हे नाव ठेवले हळू हळू दिवस जात होते सुजाता त्याच बालपण मायेने जपत होती.


त्याच ते रांगण , छोट्या छोट्या पावलाने धरून धरून चालणं, आता अथर्व 1 वर्षाचा पूर्ण झाला होता.पण अडचण अशी होती त्याला समजत सगळं होत पण बोलता येत नव्हतं.


1 वर्षाचा झाला म्हणून पहिला वाढदिवस जोरात केला.येणारे जाणारे पाहुणे मंडळी काही काही असतात हिंणवणारे, चौकशी करणारे, त्यांनी विचारलं सुजाता हा बोलत कसा नाही ?त्या प्रश्नाने सुजाता नाराज व्हायची तिला थोडं वाईट वाटायचं.


याच्यासोबतची सगळी मुले बोलतात हा काबर बोलत नसेल?

असच आम्ही मैत्रिणी गप्पा मारत बसलो तेव्हा सुजाता सार्थकला घेऊन आली .तबेतीने धस्ट पुष्ट गोबरे गाल, सुंदर अस बाळस, छान दाट केस सगळ्यांना तो खूप आवडतं असे.


एकदा मी असच बाहेर बसले तेंव्हा सुजाता आली थोड्या गप्पा झाल्या परत विषय सार्थकवर आला बघाना हो वाहिनी हा बोलेल की नाही तिचा तोच प्रश्न?


मग मी तिला सहज म्हणाले , तू याला याच्यासोबतची मुलांसोबत खेळायला पाठवत जा त्याच्याशी तू गप्पा मार, आठदीवस सोबतच्या मुलांसोबत राहून त्यांचे बोलणे पाहून हळू हळू त्याचीही जीभ वळवळू लागली तोही शब्द उच्चरण्याचा बोलायचं प्रयत्न करू लागला.एक दिवस आम्ही बाहेर गप्पा मारत असताना सार्थक आणि त्याचा मित्र समोरच खेळत होते, मित्र म्हणाला, "सार्थक बघ तुझी आई तिला आवाज दे, म्हण आ ई ,आ ई अस तो दोनदा तीनदा म्हंटल्यावर सार्थकच्या तोंडातून पटकन आ ई हा शब्द निघाला, मित्राने त्याला त्याच्या आईजवळ आणलं आणि म्हणाला म्हण, आ ई सार्थकने लगेच आ ई शब्द उच्चरला, सुजाताचा आनंद गगनात मावेना तिने आपल्या लेकराला उचलून कडेवर घेतले , आणि तिचा तो आनंदी चेहरा बघून मी तर निशब्दच झाले.खरच किती ताकद असते ना आई या प्रेमळ शब्दात ती सगळं दुःख विसरून सगळ्यांना सांगत सुटली, बघाना, अथर्व आई म्हणतोय, म्हण बेटा आ ई त्याने लगेच म्हणून दाखवलं आज त्या शब्दशिवाय सुजाताला काहीच सुचत नव्हते खरच मुलाने मारलेल्या शब्दात किती वात्सल्य, प्रेम माया, आपुलकी असते ना हो ना?



Rate this content
Log in