Sunita Ghule

Others

5.0  

Sunita Ghule

Others

फरपट

फरपट

3 mins
1.7K


ओल्या कच्च्या सरपणाच्या धुराने तिचे डोळे चुरचुरत होते. घराला सारी कडून ओल आली होती. कुठे कुठे थोडासा कोरडा तुकडा झोपडीत कवडशा प्रमाणे चमकून उठत होता. पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी भाकरी थापत होती इतक्यात तिचा सात वर्षाचा लेक शेंबूड पुसत एका हाताने चड्डी वर ओढत तिला हाक मारत आला.

"माया आवरती का गं, शाळेला उशीर झाला गं मला"

ती उत्तरली," अरे बाबू आता झालीच बघ भाकरी!!"

त्याच्या ताटात टाकत माय म्हणाली. मायेचे केविलवाणं रूप पाहून त्याचं मन गलबललं. दोन घास पोटात टाकून शाळेच्या दिशेने धूम ठोकली .तो आता दुसरीत शिकत होता.त्याची लहान बहीण झोळीत अंग गोळा करून झोपली होती.

बा सकाळीच शेतावर पेरणीसाठी गेला होता. घरातलं गोठ्यात लवकर काम आवरून मायनं आवरलं. नि डोक्यावर पाटीत भाकरीची शिदोरी घेऊन ती मळ्याच्या दिशेने वाटेला चालू लागली.

किसनाचा बाप दौलती मोठा नेक दिलाचा माणूस होता. गरिबीच्या संसारात कोंड्याचा मांडा करून नवरा बायको कसेतरी दिवस काढत होते. सुखानं दोन घास लेकरांना मिळावेत म्हणून कष्ट उपसत होते. किसनाही शाळेत हुशार होता.गुरुजी त्याचे नेहमीच कौतुक करायचे. तेव्हा दौलतीचा उर अभिमानाने वरून यायचा. त्याला पितृसुख लाभले नव्हते. पण लेकाचं कौतुक करायचे तो कधीच सोडत नव्हता.माझा किसना चुकून मोठा होईल मग मला सुखाचे दिवस येतील, तो पार्वतीला त्याच्या बायकोला नेहमी म्हणे. पार्वती ही लेकाला प्रेमाने न्याहाळत राही. त्याला काही कमी पडू नये म्हणून दक्ष असे.

असे दिवस जात होते कधी दुष्काळाने तर कधी अवकाळीने शेतीला ग्रहण लागले होते. पण उद्याची स्वप्न जगण्यास बळ देत होती .कसेबसे दिवस जात होते .रोशनी किसना ची छोटी बहीण आता शाळेत जाऊ लागली .दिवस भरभर सरत होते .किसना दहावी पास झाला.मायबापाच्या आशीर्वादाने चांगले गुण मिळून मोठ्या कॉलेजात तालुक्याला ऍडमिशन मिळाले.

शिक्षण चालू होते दिसामासाने वाढणारी ही संसार वेळ पाहून नवरा बायको सुखावत होते. आणि आणि एक दिवस घात झाला. रात्रीचे आठ वाजले होते .दौलती बैलांना वैरण पाणी करून नुकताच पडवीत विसावा खात होता.दोघे जण गावाच्या दिशेने पळत येताना दिसले. दौलती गपकन उठून उभा राहिला.

" का रं काहून पळत सुटलासा?" दौलती म्हणाला.

" शहरातून निरोप आलाया, फोन आला होता, तुझ्या किसनाचा म्हणे ,अपघात झालाय."

त्याने गपकन डोळे मिटले. इतक्यात आतून किसनाची माय धावत बाहेर आली. गावकऱ्यांनी तिला निरोप सांगितला. लेकीला सांगून दोघेही जायला निघाले. पार्वतीच्या डोळ्याचं पाणी हटेना दौलत तिला आधार देत होता.

' काय झालं असनं किसनाला या विचारानं तिचं डोकं सुन्न झाले होते. कसेबसे गाडी करून दोघेजण सोबत घेऊन ते शहराकडे निघाले .रात्री उशिरा दवाखान्यात पोहोचले. किसनाला कॉटवर बेशुद्ध अवस्थेत पाहून माय बापाचं काळीज विदिर्ण झालं .पार्वतीने हंबरडा फोडला.

"असा कसा रे काळ कोपला, डॉक्टर साहेब कितीही खर्च होऊ द्या, पण माझ्या लेकराले बरं करा"

पार्वती कळवळून बोलत होती. दौलतीच्या तर पायाखालची जमिनच सरकली .काय सपन पाहिलं, लेकासाठी नि काय झालं नियतीने डाव साधला. रातभर लेकाच्या तोंडाकड दोघे पहात बसले. पहाटे थोडा वेळ डोळा लागला. तर नर्सचा आवाज आला. "डॉक्टर ,पेशंट शुद्धीवर येतोय ,डोळे उघडतोय."

डोळे उघडून आईकडे पाहिले माय म्हणून क्षीण आवाजात हाक मारली .पार्वतीला भरून आले. पार्वती कसेबसे अश्रू आवरून म्हणाली," बाळा तू लवकर बरा व्ह रं. आम्ही किती बी कष्ट करू, काय वाटेल तेवढा पैसा लावू ,तू काळजी करू नगं."

इतक्यात डॉक्टर आले त्यांनी पेशंटला तपासले. पेशंट आता धोक्याच्या बाहेर आहे. पण पायाच्या हाडाचा चुरा झाला आहे, बहुतेक पाय कापावा लागेल. डॉक्टरांचे बोलणे ऐकून कुणी कानात गरम शिसे ओतते की काय असे दौलतीला वाटले. सोन्यासारखा बरोबरीचा पोरं असा अपंग होऊन पडणार, काय स्वप्न पाहिली मी !!! काय झाले? त्याचा विश्वासच बसेना, कुणीतरी खोल खोल गर्तेत ओढून नेत असल्याचा त्याला भास होऊ लागला.

" माय शाळेला उशीर होतोया".

किसना अर्धवट शुद्धीत बरळत होता.


Rate this content
Log in