Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

पाठवणी

पाठवणी

1 min
1.6K


  कारमध्ये बसताना लेकीने मागे वळून पाहिले. रडून सुजलेले डोळे बापाला शोधत होते. इतके वेळ अश्रूंचा आवरून धरलेला बांध लेकीशी नजरानजर होताच धो धो वाहू लागला. मुद्दामच त्याने लेकीला पाठवणीच्या वेळी समोर जाणे टाळले होते. 


   रूणझूण पावलांनी अवघे भावविश्व व्यापून टाकणारी त्याची लाडकी लेक आज दुसऱ्याची झाली होती. चिवचिवत राहणाऱ्या या चिमणीने ओंजळीत पितृत्वाचा आनंद भरभरुन ओतला होता. बालपण सरले. उच्चशिक्षित झालेली कन्या विवाहबंधनाने क्षणात परकी होणार, याविचाराने बापाचा जीव कासावीस होत होता. सारा भूतकाळ चित्रपटाप्रमाणे सरकत होता. हुंदका अनावर होऊन पटकन तोंडाला रूमाल लावला,ओक्साबोक्सी रडू लावला.


 जावयाचा हात हातात घेत बाप सावरत कसेबसे उद्गारला,

 " काळजी घ्या माझ्या काळजाच्या तुकड्याची!!!"


Rate this content
Log in