घड्याळ
घड्याळ
1 min
1.5K
घड्याळ
घड्याळाची टिक टिक ऐकून त्याला जाग आली. आई जवळ बसून त्याची उठण्याची वाट पाहत होती. तो रात्री झोपला तरी किचनमध्ये आईचे काम चालूच होते. त्याच्या अगोदर उठून बराच वेळ आई सकाळची कामे आवरत होती.
कल्पनेने त्याचा ऊर कृतज्ञतेने भरून आला.
'आई' त्याने लाडीक हाक मारली.
डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली "झोप झाली का माझ्या बाळाची?"
"माझ्या झोपेचे काय गं आई?"
"तू दिवसभर काम करुन दमतेस;घड्याळाच्या ठोक्याबरोबर सकाळी माझ्या अगोदर उठून सर्वांची तयारी करतेस!"
"कसं जमतं तुला हे?"त्याने विचारले.
हसून आई उत्तरली," आईपण सारं शिकवते बाळा, त्यासाठी नाही वेगळी शाळा!!"
'आई बाळाबरोबर संयमाला जन्म देते!!!'