STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

पाऊस

पाऊस

1 min
193

सकाळीच आज आई मला शाळेत जाण्यासाठी उठवत होती.मी डोळे चोळतच उठले.आई ओरडली म्हणून भर भर आवरून तयार झाले.


आईने डबा भरला तस बाहेर बघितलं तर आभाळ काळकुट्ट झालं होतं आज माझा गणिताचा पेपर होता .अभ्यास तसा काही फारसा झालेला नव्हता.


तसही माझा आणि गणिताचा छत्तीसचा आकडा होता.आभाळ बघून तसा मनोमन आनंदही झाला होता पण तो कोणाला दाखवता येत नव्हता.


घरातून बाहेर निघणार तोच धो धो पाऊस सुरु झाला.बाबांच्या मोबाईलवर मॅसेज आला की आज शाळेला सुट्टी देण्यात येत आहे . बाबांना देखील सुट्टी होती मी बाबासोबत थोडा वेळ घालवला आणि थोडा वेळाने गणिताचा चांगला अभ्यास केला.


नावडता विषय आवडता करायचा म्हणून चार पाच वेळेस सगळे गणिताचे प्रॉब्लेम सोडवले आणि छान अभ्यास केला.


आई बाबांनी देखील माझे कौतुक केले.दुसऱ्या दिवशी शाळेत घेतलेला पेपर एकदम सोपा गेला. मी उगाच गणिताला घाबरत होतो.

त्यादिवशी जर धो -धो पाऊस आला नसता तर माझी गणिताच्या पेपर अवघड असतो ही भीती कधीच मनातून गेली नसती हो ना?


Rate this content
Log in