Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

पाऊस आणि बालपण

पाऊस आणि बालपण

1 min
232


पाऊस आणि बालपण

"येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा" हे बालपणीच गाण सगळ्यांचं ठरलेलं असायचं.


पाऊस आला की सगळीकडे कसे हिरवेगार, थुई थुई नाचणारे मोर, पाण्यात डराव, डराव करणारी ऊड्या मारत चालणारे बेडूक, सुसाट्याने सुटलेला वारा, तुडूंब भरून वाहणारी नदी, ओढे, नाले,यांचा होणारा,आवाज ,कडकडणारी वीज,पावसात बालपणी शाळेत जाण्याची मजाच वेगळी, पावसात साचलेल्या डबक्यात उड्या मारत दुसऱ्यांच्या अंगावर चिखल उडवत चालतांना खूप मजा यायची.


बालपणी कुठल्या छत्र्या ?एखाद्या गोणीचा गोणपाट करून पाऊस लागू नाही म्हणून अंगावर घ्यायचा, त्यात हातातलं दप्तर भिजू नाही म्हणू स्वतःला पाऊस लागला तरी चालेल परंतु वह्या पुस्तकांना जपत घरी यावे लागत.

एरव्ही पावसात खेळल्यावर रागवणारी आई, शाळेतून आल्यावर व्यवस्थित डोकं पुसून घे, तुला छान अद्रकाचा चहा देते, दप्तर ओले झाले नाही ना?असे आमची लाड करायची.


विजेच्या होणाऱ्या कडकडाची तर खूप भीती वाटायची.त्यामुळे वीज चमकत असतांना पावसात बाहेर जाणे टाळावे लागत होते.


परंतु हिरवागार झालेला निसर्ग सुंदर वाटायचा. पानावर पडलेले पाण्याचे थेंब मोत्यासमान चमकायचे.जस काही धारणीमातेला हिरवा शालू सन्मानाने देऊन तिचा सत्कार केल्यासारखा वाटायचं.


शाळेत जातांना कधी कधी सुंदर दिसणारा इंद्रधनुष्य याचे दर्शन व्हायचे.त्याकडे आम्ही बघत बसायचो ,सप्तरंगाची उधळण करत तो जणूकाही आकाशी रंगीत झालरीचा मंडप घेऊन आला की काय असं वाटायचं.


सुंदर ती निसर्गाची दृश्य पाहून डोळ्यांची पारणे फिटायची.

खरच किती सुंदर होत ना बालपण आणि बालपणी पडणारा पाऊस?


Rate this content
Log in