STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

नवरात्र

नवरात्र

4 mins
9

स्त्री - नवशक्तींचा जागर नवरात्र.
 नवरात्र म्हटले की घराची साफसफाई. अगदी अंथरुण पांघरुण पासून ते पूर्ण घराचे जळमट काढण्यापर्यंत. हल्ली एवढे घर घाण कोणाचेच नसते. पण तरी एक पूर्वा पार चालत आलेले परंपरा म्हणूया आणि त्या अनुषंगाने आपण आठवड्यावर आधी घराच्या साफसफाईला लागतो. कारण आपल्या घरात देवीचे वास्तव्य होणार असते. देवीचा नवरात्र दिवा लागणार असतो. हा दिवा मांगल्याचे प्रतीक सतत ठेवत तेवणार असतो. पवित्र मनाने निर्मळ मनाने केलेली ही पूजा आपल्याला प्रेरणादायी ठरते. मांगल्यदायी ठरते. पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आधीच तयारी होते. मनाची शुद्धी, सकारात्मक विचार, नवीन ऊर्जेचा उगम, वाईट विचारांची होळी, आत्मविश्वासाची निर्मिती अशा अनेक गोष्टी या नवरात्रीमध्ये आपण आपल्यात निर्माण करायच्या असतात. आणि त्या कायम स्मरणात राहून त्याची कृती आपल्यात दिसून यायला हवी. तसा आपल्या वागण्यात फरक पडायला हवा. असे हे नवरात्र सर्वांचे जीवन बदलत जाते. विचारात सात्विकता आणते. पिढ्यानं पिढ्या आलेले हे नवरात्र उत्सव आजच्या पिढीला सुद्धा बंधनकारक असते. आणि हो आजची पिढी सुद्धा यामध्ये उत्तमरीत्या कार्य करून दाखवते. देवाची पूजा अर्चा नीट करून दाखवते. आपल्या पुढील पिढीला संस्कार देण्याचे कार्य करते. मग या नवरात्रामध्ये आपण नवशक्तींचा जागर करूयात... आपल्या मधली पहिली *आत्मविश्वासाची शक्ती* आहे ती आपण आपल्या मधे आणूया. बऱ्याचदा असे दिसून येते की आपण इंटरव्यूला गेलोय आणि आत्मविश्वासाने बोलत नाही तिथे आपला इंटरव्यू फेल होतो. उदा- आपला इंटरव्यू घ्यायला दोन व्यक्ती बसलेले आहेत ते आपल्या इंटरव्यू घेत आहेत, इंटरव्यू घेताना त्यांनी सहज विचारलं तुमच्या शर्टला बटन किती? तुम्ही पटकन तुमच्या शर्ट कडे बघून मोजली बटन आणि सांगितलं तर तुमचा इंटरव्यू फेल जातो. पण तुम्ही छाती ठोक सांगितलं चार बटन आहेत किंवा पाच बटन आहेत त्या ठिकाणी तुमचा तो आत्मविश्वास पाहिला जातो. कोणतेही कार्य करताना *धीट पणा हवा धैर्य हवे* जीवनामध्ये अनेक आव्हानांना आपल्याला सामोरे जावे लागते. जीवन हे एक सुखदुःखांचे माहेरघर आहे असे म्हटले तरी चालेल. या ठिकाणी आपली भीती आपली संकटे सर्व बाजूला ठेवून जर का आपण ह्या जीवनात आलेल्या अडचणींना धैर्याने तोंड दिले तर धीट पणाने तोंड दिले तर आपला विजय निश्चित आहे. मनातल्या भीतीला बाजूला सारून धैर्याने तोंड दिले असता जीवन सुखाचे होऊ शकते. *सकारात्मक विचार* हे हवेतच. उदा- एक ग्लास अर्धा पाण्याने भरलेला आहे. आपण जर का विचार केला की हा अर्धा ग्लास भरलेला आहे तर तो नकारात्मक विचार होईल पण आपण जर का हा विचार केला की अरे हा अर्धाच आहे हा प्याला आपल्याला पूर्ण भरायचा आहे त्याला आपण तिथे सकारात्मक विचारांनी व्यापले जातो. याचा अर्थ असा की आपल्याकडे आलेला कोणतंही संकट बाजूला सारताना असा विचार करावा की देवाने मला हे संकट दिले आहे याचे कारण मी ते संकट पेलण्यासाठी मजबूत आहे. *आधुनिक जीवनशैली* मध्ये आपण आपला मित्र परिवार,नातेसंबंध यांच्याशी आपल्याला जुळवून घ्यावेच लागते. कधी आपले विचार त्यांना पटतात कधी त्यांचे विचार आपल्याला पटतात, तर कधी वादविवादही होतात,तर कधी विचार पटतच नाहीत,पण अशा वेळेला आपल्याला सर्वांशी पटवून घ्यावे लागते मिळते जुळते घ्यावेच लागते. हीच माणुसकी आपण आयुष्यभर जपत असतो. समोरच्या माणसाला बदलणे शक्य नाही पण आपण आपल्या स्वतःत बदल करता आला तर शंभर टक्के तो करावा आणि माणुसकीला धरून रहावे हेच *जीवनाचे खरे कौशल्य* आहे. आपण इतरांशी संवाद साधताना तो नम्रपणे साधावा. आपल्या विचारांची सांगड घालून आपण जर का एखाद्याशी बोललो तर तो *संवाद प्रभावी* ठरला पाहिजे. हा आपला प्रभावी संवादच आपल्यातले नाते दृढ करतो. *शब्द हा आपल्या विचाराचा पुत्र आहे*. हा शब्द मुखातून गेला की परत घेता येत नाही. अशावेळी खरंचच विचार करून बोलणे फार महत्त्वाचे असते. याचाच अर्थ संवाद छान केला तर वाद होणार नाहीत. समाजामध्ये कायम आपण शिष्य आहे असेच वागावे. हल्लीच्या या लहानपिढी कडून सुद्धा आपण अगदी 70 वर्षांची जरी झालं तरी या दोन वर्षाच्या मुलांकडून शिकण्यासारखे खूप काही. उदा- काही जणांना अजूनही स्मार्टफोन मधलं कळत नाही. पण हे दोन वर्षाची मुले आहेत ना ती पटापटा,पटापटा ते बटन दाबतात आणि कुठे कसे जातात पण त्यांना युट्युब माहित असतं त्यांचा खेळ त्यांना माहीत असतो ते डाउनलोड करू शकतात. हे शिक्षण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. म्हणजेच काय तर *माणूस हा सतत शिष्य आहे* आणि हा शिष्य झाला तर नम्रपणे वागू शकतो. मलाच सर्व येते आणि मीच सर्व शिकवणार असे म्हटले तर तो माणूस समाजामध्ये अप्रिय ठरतो. म्हणून माणसानं कायम शिकण्यासाठी तयार असावे. नवनवीन कौशल्य अनुभवण्यासाठी तयार असावे स्वीकारण्यासाठी तयार असावे आणि हीच *मानवाची खरी प्रगती* होते. कारण माणूस हा निरंतर शिष्य आहे शिकण्याची प्रक्रिया त्याची कधीच संपत नाही. *सर्वांवर प्रेम करावे प्रेमाने जग जिंकता येते.* रुसवे फुगवे नकोत. राग द्वेष नको. अहंकार नको मत्सर नको. सर्वांना प्रेम देऊया आणि प्रेम घेऊया. आनंद देऊया आनंद घेऊया. जीवन समाधानात जगू या. आनंदात जगूया. सुखदुःखाच्या झोक्यावर तर बसावेच लागते. या झोक्यावर आनंदाने झोके घेतले तर काय बिघडते. जीवनाचा हा झोका घ्यायचाच आहे तर आनंदाने घेऊया, स्वीकारूया... नवरात्रीच्या यानिमित्ताने लिहिलेला माझा हा लेख आपल्या सर्व भगिनींना आणि बंधूंना, मित्र परिवाराला समर्पित आहे. जशी मी आहे तसे माझ्या लेखनातून उमटते. वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा- पुणे मो. नं. 9823582116


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్