STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Fantasy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Fantasy

नशीबवान प्रजा

नशीबवान प्रजा

2 mins
269

चंद्रपूर राज्य सुख समाधानाने नांदत होत राज्याचा राजा ही आपल्या प्रजेची नीट काळजी घेत असत राज्यतले लोक असा राजा लाभला म्हुणुन खुश होते राजा प्राणी मित्र हि होता सगळे कसे सुख समाधान होते. 

एकदिवशी अनर्थ घडला राज दरबार लोकांनी गजबजून गेला एवढे लोक प्रथम च राज दरबारी आले होते राजा हि गोधळून केला 

"सेनापती एव्हडी गर्दी काय झालं "?

"महाराज कधी हि आपल्या राज्यात न घडलेला प्रकार घडला आहे "

"काय झालं सेनापती "?

"महाराजा गेले चार पांच दिवस आमच्यावर प्राण्याचा हल्ला होत आहे "

"काय प्राणी हल्ला "?

"हो महाराजा देव बळवंत म्हूणन नुसते जखमी झालो नाही तर प्राण गेले असते "

"पण प्राणी प्रथम एवढे उग्र झाले आहेत एक काम करा प्राण्याना राज दरबारात बोलवा "

सेनापती जंगलात गेले व राजाचा सांगावा सांगितला तसे प्राण्याचा राजा सिंह काही प्राणी जैसे हत्ती माकड ससा मोर हरीण राज दरबारात पोहचले 

"या माझ्या मित्रानो आज प्रथमच मी तुम्हला असे पाहत आणि तुमच्या बद्दल ऐकत आहोत आपल्या राज्यात माणसा सह प्राण्यांवरही कधी अन्याय होऊ दिला नाही आणि आज आमच्या राज्यात एवढा हा असंतोष "

"महाराज माफी असावी पण प्राण्याचा राजा ह्या नात्याने आम्ही जे केलं ते योग्य होत असं मला वाटते "

"सिहं महाराजा आपल्या राज्यात कधी असे घडले नाही मग आता च असे काय घडले जे हल्ल्यावर उतरले "

"महाराजा तुम्हला माहित नसेल पण गेले काही दिवस आमची शिकार होत आहेत त्यात आमचे कित्येक मित्र आपले जीव गमावून बसले काही नाहीसे झाले "

"काय शिकार "

"हो महाराज "

"पण आपल्या राज्यात शिकारीला बंदी आहे "

"मग महाराज आमची शिकार कोण करू पाहतं मग आम्हला राग येणार ना "

"माफी असावी माझ्या प्राणिमित्रांनो मला हि माहिती नव्हती "

"सेनापती आता च्या आता त्या शिकारीला पकडा "

"महाराजा ते तुमचे चिरंजीव आहेत "

"काय म्हणजे तुम्हला हे माहित होते"

"हो महाराजा एवढ्या वर्षांनी छोटे महाराज घरी आले आहे म्हणून मी गप्प बसलो "

"सेनापती माझ्या राज्यात अशी परिस्थिती प्रथमच आली आहे सगळे जण कसे आनंदात राहत होते आणि आज "

"माफ करा प्रजा मला आज हा राजा असमर्थ ठरला "

"सेनापती दोषीला दंड द्या '

"माझ्या राज्यातल्या मनुष्य आणि प्राण्यानो ह्या पुढे असे काहीही होणार नाही ज्या मुले तुम्हाला त्रास होईल "

महाराजाच विजय असो माणसांनी आणि प्राण्यांनी एकच जय घोष केला 

राज दरबारातून माणसे आणि प्राणी आपल्याला भाग्यवान राजा भेटला म्हूणन आनंदात बाहेर पडले 


Rate this content
Log in