Anila Fadnavis

Others Inspirational Abstract

2  

Anila Fadnavis

Others Inspirational Abstract

नजर (भाग एक)

नजर (भाग एक)

2 mins
8.3K


आज प्रवासाचा दुसरा दिवस. तिरीमिरीने नाही पण आपणही करू शकतो म्हणून आम्ही चौघं मोटारीने मुंबई नागपूर प्रवासाला निघालो होतो. आदल्या दिवशी नाशिकला आलो. आराम केला. गाडी नीट आहे, इंधन, टायरमधे हवा आदि पाहून ठेवले. सकाळी साडेपाचला निघायचे ठरवले. निघता निघता सहा वाजलेच. किती सहज लिहिले मी. आधी ठीक होतं पण आता ..

नेहमी सर्रास होणारे मोतीबिंदूचे अॉपरेशन सफल झालं नाही. मी अंध झाले. म्हणे दहा हजारात एखादा असा कमनशिबी असतो. मीच का? माझेच का? हा विचार मनात येऊन येऊन डोकं ठणकायला लागलं. क्षणोक्षणी एकच विचार.

घरी येऊन पलंगावर झोपून राहिले. आजूबाजूला खूप शांतता होती. कुणी टीव्ही लावला नव्हता. रेडिओ पण बंद होता. तसा घरातही‌ काहीच आवाजही नव्हता. सगळेच सुन्न झाले होते. मी जरा काही हालचाल केली की, पुढे सरसावत होते.

"काय हवंय?"

अनेकदा मला सांगताही यायचं नाही, कारण सहजच कपाट उघडून जी हवी ती साडी, ब्लाऊज निवडता येत होतं. आज मी कोणती साडी नेसलीय हेच माहीत नसतं. आता काय घालायचं हे मी कसं सांगणार? जे कपडे घातलेले आहेत ते नीट आहेत का? साडी एक सारखी चाचपून पहावी लागते. तरी नीट झाली की नाही कळतंच नाही. केसांना डाय करत होते, आता मला दिसतच नाही. आज वार कोणता, तारीख काय आहे? मला माहीत नसतं, म्हणजे सारखं विचारावं लागतं. संकोच वाटतो. आपलं आपण करावं अशी इच्छा तर असते पण रोज प्रत्येक कामासाठी अवलंबून रहायचं ही मोठी शिक्षा झाली होती मला. 

घरातली गृहिणी मी. कधी आजारी असले तर घर पण अत्यवस्थ होत असे. आता घरात रहाणारं माझं कुटूंब. बिचारे किती केविलवाणे झाले असतील. सगळे मोठे आहेत व्याधी पण एक घराचं सांधलेपण राखणारी मी, मीच अशी त्यांच्यावर भार होऊन राहिले. क्षणोक्षणी "आई, मी येते गं" म्हणून बाहेर निघणारी नेहा, अन् उमेश आता एकमेकांना सांगून आलटून पालटून बाहेर पडत होते. शक्यतोवर बाबांवर मला एकटीला सोडून जात नव्हते.

ते तिघेही एकमेकांना किती जपत होते. यथावकाश मी माझी नेहमीची काम़ करण्यास सुरुवात केली. सगळे उठायच्या आत चाचपडत तोंड धुणे, केस विंचरणे इत्यादी कामं न धडपडता करायला शिकले. त्यामुळे फक्त चहाची वाट पहात बसायचे. उगाचच धडपडले तर सगळ्यांना त्रास होईल म्हणून.

आता या आंधळेपणाचा बाऊ करून घ्यायचा नाही असे मनोमन ठरवायची.

जे जन्मांध असतील त्यांच्या दु:खापपुढे....

हं, या दु:यापुढे आपण काहीही नाही. म्हटलं तर सगळं जगही पाहिले होते मी. काही टक्का सुद्धा त्यांनी नजरेचे सूख उपभोगलेले नसते.

मग आपण तर...


Rate this content
Log in