STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Fantasy

2  

akshata alias shubhada Tirodkar

Children Stories Fantasy

मोटू बनला पतलू

मोटू बनला पतलू

2 mins
385

कॉक कॉक कोंबड्याने आवाज दिला आणि पतलूचे डोळे उघडले. 


"अरे हा मोटू कुठे गेला?"


"मोटू मोटू कुठे बरं केला असेल हा सकाळ सकाळीच..."


टक टक

 

"आता कोण आलं..."


"अरे मोटू तू एवढ्या सकाळ सकाळीच कुठे गेलास होतास?"


"मॉर्निंग वॉकला..."


"मॉर्निंग वॉक..."

 

"हो मी बारीक व्हायचं ठरवलंय..."


"मोटू पण का..."


"अरे पुढच्या महिन्यात मिस्टर फुरफुरीनगर या स्पर्धेत मी भाग घेणार आहे, त्यासाठी मला फिट असायला नको... तिथे भाग घेण्यासाठी फिट तर असायला हवं..."


"अरे पण तुला कशाला हवी स्पर्धा तू तर फुरफुरीनगरचा हिरो आहेस..." 


"नाही पतलू मला मिस्टर फुरफुरीनगर व्हायचं... माझा आवडता हिरो त्यात परीक्षक म्हणून असणार आहे..."


"बरं जशी तुझी मर्जी मोटू..."


"चल चहा करतो, चहा पिऊया..."


"नको पतलू मी चहा सोडला, आजपासून फक्त ज्युस पिणार..."


दुपार होत आली मोटू आपल्या जगातच होता. 


"मोटू मोटू अरे कधीपासून हाक देतोय चल जेवुया..."


"नाही पतलू मी डायटींगवर आहे त्यामुळे तू जेव..."


"अरे पण म्हणून तू खाणं सोडणार आणि तुझ्या आवडीचा सामोसा..."


"सोडणार..."


"काय..."


"हो पतलू मिस्टर फुरफुरीनगर होने के लिये सामोसे को खोंना पडेगा..."


असेच दिवस जात होते मोटू डायटींगवर होता. मॉर्निंग वॉक आणि नियमित व्ययाम चालू होता. मोटूने बरेच वजन कमी केले होते. ऑडिशनचा दिवस उजाडला. सगळ्यांबरोबर मोटूही रांगेत उभा राहिला.


मोटूचे नवे रूप पाहून सगळे अवाक झाले होते. एक एक ऑडिशन देऊन मोटूने अंतिम स्पर्धेत प्रवेश केला. ही बातमी सांगण्यासाठी त्याने घरी धाव घेतली.


"पतलू पतलू..."


"अरे काय झालं मोटू..."

 

"मी अंतिम फेरीत पोहोचलो..."


"अभिनंदन मित्रा मला माहीतच होते म्हणून तर मी तुझे आवडते सामोसे आणले आहेत. आज पाहिजे तेवढे खा. मानलं तुला. मित्रा तू खरंच केवढा बारीक झाला आहेस. माझ्यासारखा. माझे कपडे पण तुला आता होतील..."


अंतिम स्पर्धचा दिवस उजाडला. सगळीकडे फक्त मोटू मोटूचे गुणगान होत होते. अटीतटीचा सामना जिंकून मिस्टर फुरफुरीनगरची ट्रॉफी आपल्या आवडत्या हिरोच्या हातून मोटूने पटकावली. सगळीकडे जल्लोष सुरु झाला. पतलूही बेधूंद नाचत होता.


नाचून नाचून शेवटी मोटू आणि पतलू घरी परतत असताना गरमागरम सामोशांचा वास मोटूला आला. ट्रॉफी पतलूच्या हातात देऊन तो वासाच्या दिशेने वळला...


Rate this content
Log in