STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

माझा आवडता चित्रपट

माझा आवडता चित्रपट

2 mins
265

चित्रपट हे मनोरंजन करण्याचे काम करते. हिंदी मराठी बऱ्याच भाषेत चित्रपट तयार केले जातात. चित्रपट काही काळासाठी आपली चिंता दूर करत असतात.


 माझा आवडता चित्रपट थ्री इडियट आहे. विद्यार्थ्यांनी हा चित्रपट आवर्जून बघायला हवा.


 मी बऱ्याचदा हा चित्रपट बघते सर्वप्रथम आमिर खान (रणछोडदास )हा चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतो .प्राचार्य वीरू सहस्रबुद्धी त्यांना वाटत असते की ,कोणत्याही विद्यार्थ्याला नंबर एक येऊन जॉब प्राप्त करायचा आहे .


आमिर खान चे म्हणणे असते की, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे करिअर निवडायला हवे डिग्रीच्या मार्गावर गुणवत्ता ठरत नसते.


 आई वडील विनाकारण त्यांच्यावर अभ्यासाचे ओझे टाकतात .त्याचे मित्र राजू रस्तोगी आणि फराहन कुरेशी हे असतात.

फरहानला वाइल्डलाइफ फोटोग्राफर बनायचे असते पण तो वडिलांच्या भीतीने त्यांना सांगत नाही.


 राजूच्या घरची परिस्थिती गरिबीची असते त्याचे पूजा पाठ व हातात घातलेल्या अंगठ्यावर जास्त विश्वास असतो .त्यामुळे त्यांचे अभ्यासात जास्त लक्ष नसते .

आमिर खानला वाटत असते की, आधी आपली क्षमता वाढवणे किती गरजेचे हे नेहमी तो समजून सांगत असतो .आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे तेच आपण करायचे असे रणछोडदास चे म्हणणे असते .


या चित्रपटात सर्वच कलाकारांनी खूप छान अभिनय केला आहे. थ्री इडियट ची कथा खूप प्रेरणादायी आहे. 24 तास आपल्या सोबत असलेल्या मित्र पहिला येतो आणि आपण शेवट नंबरला येतो याचे शेवटी वेळ निघून गेल्यावर थोडे वाईटच वाटते .

परंतु अभ्यासात रट्टा न मारता अनेक जण आपल्या परीने समजून घेतात. प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते .कोणी एक पाठी तर कोणाला जास्त वेळेस एकच गोष्ट वाचावी लागते त्यामुळे आपल्याला जे करायचं ते मनापासून करा आणि यशस्वी व्हा.


Rate this content
Log in