माहेरची साडी
माहेरची साडी
माहेरची साडी या चित्रपटात अलका कुबल यांनी छान भूमिका पार पाडली. माहेरी वडिलांचं प्रेम मिळत नाही . सासरी आल्यावर सासू छळ करते . नवरा पण आईच ऐकत असल्यामुळे तो ही तिला त्रास देत असतो .
सुख म्हणजे काय असत हे तिला लहानपणापासून माहीत नसत .तरीही तिचा जगण्याचा संघर्ष खूप मोठा असतो .
माहेरी वडील विक्रम गोखले सारखा राग राग करत असतात . सारखे घालून पाडून बोलत असतात .घरात वाईट झालं की हीच्यमुळेच झालं असं त्यांना वाटायचं.
नंतर लग्न झाल्यावर चांगला मुलगा बघून लग्न करून दिलं पण तोही आईच एकूण अलका कुबल यांना त्रास देत असत .
पण कोणतीही स्त्री आपल्या नशिबी आलेले दुःख कधीच कोणाला सांगू शकत नाही तरीही ती संसाराचा गाडा ओढत असते .
सासरी आईच ऐकून नवरा देखील त्रास देत असतो . तरीही सगळ निमूटपणे सहन करणारी अलका कुबल हिने चित्रपटात चांगले काम केल्यामुळे जनतेच्या मनात कधीच घर केले होते .
तिचा भाऊ फक्त तिला जीव लावत असे जीवापाड प्रेम करत असे . परंतु सासरी गेल्यावर ,सगळ्यांची मने जपून , कष्ट करून तीच्या वाट्याला येणार दुःख खूप भयंकर होत .
कष्टात जीवन जगणारी अलका कुबल एका गोंडस बाळाला जन्म देते. तेही तिच्या जिवावर उदार होऊन .सासूला आनंद होतो पण आपल्या सुनेची काळजी तिला नसते .
अशेच तिचे जीवन संपते नंतर वडिलांना सर्वांना पश्चाताप होतो . राग राग करणारे वडील शेवटी स्मशानभूमीत आपल्या मुलीला माहेरचे वस्त्र देतात. व आपल्या केलेल्या कर्मावर पश्चाताप करतात .
