Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

जीवनरंंग

जीवनरंंग

1 min
138


*स्वभाव म्हणजे रंगांची पेटी!*

*तो चेहर्‍यावर जाणवतो. नयनातून सांडतो. त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. कोणाच्या जीवनातील आनंद हिरावून घेतला जाणार नाही. याची कायम आपण दक्षता घ्यावी.*

  *लाल रंग जीवनातील उद्रेक दाखवतो. तसेच लाल गुलाब प्रेम दाखवतो. लाल रंग ज्या ठिकाणी ज्या स्वरूपात वापरला जाणार आहे त्यावर तो उद्रेक की प्रेममयी भावना जपतो हे समजते.*

   *हिरवा रंग सृष्टीचे सजलेले रूप. मनास कोमल भावनांची साद घालते. सृष्टी चेतनामयी ठेवते.तसेच मन शांत ठेवते.*

   *पांढरा रंग शांततेचे प्रतिक आहे.*

  *असे प्रत्येक रंगाचे वेशिष्ट्य ठरलेले आहे.*

*या जीवनात रंगांची रेलचेल आवश्यक आहे. कोणता रंग जीवनी आनंद देतो याचा विचार करून आपण तसे वागत असतो.*

   *अगदी रोज परिधान करणार्‍या कपड्यांपासून ते आवडीचे पेन याच्या रंगापर्यंत आपले मन मानेल तेच रंग वापरतो किंवा जो रंग आपल्यावर खुलेले तोच रंग वापरत असतो.*

    *अंगावर घेण्याची शाल असो किंवा चादर असो.तिचाही रंग आपल्याच आवडीचा असतो*

    *शेवटी आपण जगातून गेल्यावर मात्र पांढरे वस्त्र लेवून जातो..शांतता..शांतता...शांतता...भयाण शांतता...*

   *या साठी जीवनातील रंगांची उधळण करा.फक्त कोणाचेही मन दुखवू नका.*

  *इतरांच्याही जीवनात आनंद फुलेल असे रंग भरा....*


*आपला दिवस आनंदात जावो   काळजी घ्या स्वतःची,कुटुंबाची,मित्रमैत्रिणींची...

🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💞💞


Rate this content
Log in