AnjalI Butley

Children Stories Tragedy Inspirational

4.3  

AnjalI Butley

Children Stories Tragedy Inspirational

एलियन बनण्याचा हट्ट

एलियन बनण्याचा हट्ट

2 mins
331


आजची ताजा खबर , आजची ताजा खबर, जगात एक विचित्र माणूस आहे त्याचा एलियन बनण्याचा हट्ट आहे! ते पण संपूर्ण ब्लॅक एलियन!


माणूस म्हणून जन्माला आला पण हट्ट एलियन बनण्याचा, तो फ्रान्सचा असून नाव अँथनी लोफ्रेडो, त्याने एलियन सारखे कुरूप म्हणू किंवा विचित्र बनण्यासाठी भरपुर पैसे खर्च केले, हाताची बोट कापली, चेहरा विद्रृप केला, आंगावर, डोळ्यात काळ्या रंगाने गोंदवले!


राधाने ही बातमी एकली, मी सुंदर दिसते म्हणून माझ्यावर एकतर्फी प्रेम करणारा माझा मित्र, मी त्याला नकार दिला म्हणून माझ्यावर भर रस्त्यावर अॅसिड फेकतो, व मला कुरूप करतो, जगते ते अर्धवट जळालेला चेहरा व शरीर घेऊन! समाजाने तर स्वीकार केलाच नाही मला माझ्या ह्या कुरूप दिसण्यावरून


मला कधी वाटलेच नाही आपण एलियन सारखो कुरूप दिसतो म्हणून, आता हीच कल्पना करू आपण एलियन सारखो दिसतो नाही आहे आणि समाजात बदल करण्यासाठी एलियन बनुण समाज जागृती करू, माझ्या सारख्या बळी पडलेल्यांना मदत करू!


कुरूप शरीराने झालो, मनाने तर अजून सुंदर बनू!

हो की नाही? मस्त आयडियाची कल्पना, दुःखी रहाण्या पेक्षा, आपला कुरूपपणा ताकद बनवू व आनंदी राहु!


जादूची छपी देता नाही येणार पण एक नविन आयुष्य जगण्यासाठी आशेचा किरण तर बनू शकतो! नक्की छान कल्पना आहे


तर चला कामाला लागु! आज राधा स्वतः खूप खुश होती!

एलियन म्हणून काय काय करता येईल ह्याचा विचार करत राहिली!


ज्या शाळेत शिकवत होतो तीथुनच कामाला सुरूवात करू!


मुख्याधिपीका बाईंची अनुमती घेऊन ती शाळेत गेली, आज ती नेहमी पेक्षा थोडी वेगळे कपडे घालुन एलियन जो सिनेमात दाखवतात तशी तयार होऊन गेली.


ऐक ऐक जण तीला पाहुन एलियन एलियन करत तीच्या जवळ आली, काही तीला घाबरून मागे गेली, बाईपण बाहेर आल्या व तीच्या समोर गोळा झालेल्यामुलांशी संवाद साधायला सुरूवात केली!


मुल ही न घाबरता तीच्या सोबत खेळत होती, कोणी तीचा हात हातात घेऊन बघत होती तर कोणी तीला एखादी कविता म्हणून दाखवायचा आग्रह करत होती, ती वेगळा आवाज काढून बोलत होती, कविता म्हणून दाखवत होती.. 

दोन-तीन तास कसे मज्जेत गेले हे तीला ही कळले नाही, शाळा सुटायची वेळ झाली, मुले परत ये मित्रा एलियन करत वर्गात गेली, बाईंनी राधाला आपल्या कक्षात बोलवले व पुढच्या आठवड्यापासून दर आठवड्याला मुलांशी मित्र एलियन बनून ये तुला त्याचा मोबदला देत जाऊ, दर आठवड्याला एक नविन गोष्ट, समस्या सोडवत जाऊ मुलांच्या. मुलांसमोर तु एलियन असेल!


बाईंनीपण तीला एलियन बनण्याचा हट्ट धरला, शाळेतल्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी!!

हो मी राधा आता मित्र एलियन म्हणून शाळेत मुलांशी खेळायला जाणार!


Rate this content
Log in