Pratibha Bilgi

Others

3  

Pratibha Bilgi

Others

एक पत्र लेकीला

एक पत्र लेकीला

2 mins
133


प्रिय सोनूस ,

आईचे अनंत अनंत आशीर्वाद आणि खूप प्रेम.

कशी आहेस ?  किती दिवस झाले , तुझ्या पत्राचा पत्ता नाही . काय ग ? कुठे एवढी अडकलीस ? अग , तुझी आई तुझ्या पत्राची आतुरतेने वाट पाहत असते , हे विसरलीस वाटतं ! रागावली वगैरे नाहीस ना माझ्यावर ?

अच्छा ! हे सगळं जाऊ दे . उत्तर पाठवायला विलंब करत जाऊ नकोस ग ! काळजी वाटते . सगळ व्यवस्थित चाललय ना ? सासरी काही अडचण तर नाही ना ? काही असेल तर कळवत जा .

बर , सासरी नीट रूळली असशीलच . सासू - सासरे , जावईबापू आणि बाकीच्या सदस्यांची सुद्धा तशीच काळजी घे , जशी आमची घ्यायचीस . काही अडचण आली किंवा कळत नसल्यास सासूबाईंना विचारून करत जा . सासरी , सासूच सुनेची आई असते . तू त्यांना समजून घेतलस , तर त्याही तुला समजून घेतील आणि तुम्ही दोघींमध्ये माय - लेकीचा बंध आपसूकच निर्माण होईल .

सगळी जबाबदारी नीट सांभाळ . सगळ्यांची मन जपण खूप अवघड असत , माहिती आहे मला . पण शक्यतो कुणाच मन दुखवू नकोस व कुणालाही तक्रार करायची संधी देऊ नकोस .

पत्र लिहिण्याच मुख्य कारण म्हणजे मी तुझ्यासाठी मोत्यांचा एक सुंदर हार बनवून घेतला होता . जरीकाम असलेल्या नक्षीदार साडयाही घेऊन ठेवल्या होत्या . परंतु तू निघताना हे सगळं दयायच राहूनच गेल . तू आम्हाला सोडून जाणार , या विचारानेच डोक सुन्न झाल होत . मुली शेवटी दिल्या घरी जातात , हे माहित असूनही स्वीकार करण किती अवघड असत हे मला तुझ्या पाठवणीच्या दिवशी उमगल . त्या क्षणाला वाटल कि एखादा घरजावई बघितला असता तर बर झाल असत . तुला आमच्या पासून दूर तरी जाव लागल नसत 

असो . आता जेव्हा माहेरपणासाठी येशील , तेव्हा या सगळ्या वस्तू घेऊन जा . खूप प्रेमाने घेऊन ठेवल्यात .

तुझे बाबा तू गेल्यापासून उदास असतात . जास्त बोलत नाहीत . तुझी आठवणच याच कारण आहे , मला माहीत आहे . गोलू तुझ्याशी किती भांडायचा , घरात गोंधळ घालायचा . आता खूप शांत राहू लागलाय . तुला जाऊन अजून आठ दिवस झाले नाहीत आणि तो कालच विचारत होता कि ताई कधी येणार ?

आता थांबवते पत्र . खुशाली लवकर कळव . तुझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत.

तुझीच आई


Rate this content
Log in